#Eid रमजान ईदनिमित्त मुस्लिम बांधव नमाजपठण करताना

मिलिंद संगई
शनिवार, 16 जून 2018

बारामती शहर - रमजान ईदनिमित्त आज बारामतीत मुस्लिम समाजाच्या वतीने ईदगाह मैदानावर सामूहिक नमाज पठण केले गेले. आज सकाळी उबेदुल्लाह काझी यांनी नमाजपठण केले. शहरातील मुस्लिम बांधव या प्रसंगी उपस्थित होते. 

इस्लाम कॅलेंडरप्रमाणे येणारा नववा महिना रमजनचा असतो. इस्लामचे प्रेषित हजरत मुहम्मद पैगंबर यांना अल्लाहकडून पवित्र कुराण याच महिन्यात प्राप्त झाल्यामुळे इस्लाम धर्मियांमध्ये या महिन्याचे विशेष महत्व असते. इस्लामची पाच महत्वाची कर्तव्ये असतात यात रोजा आणि नमाज यांचा समावेश होतो. अल्लाहच्या जवळ जाण्याचा मार्ग म्हणून रमजानच्या महिन्यात रोजा, नमाज, कुराणपठण व जकात (दान) यांना महत्व दिले जाते. 

आज बारामती शहरातील जामेमशीद, चॉंदशाहवली मशीद, कसबा भागातील मक्का मशीद, छगनशाह मशीद, दर्गा मशीद येथेही आज रमजान ईदनिमित्त नमाज पठण झाले. मुस्लिम बांधवांनी आज जकात व फित्रा हे धार्मिक विधीही पार पाडले. शहरातील अनेक मुस्लिम बांधवांकडे आज शिरखुर्मा कार्यक्रमास सर्वधर्मियांनी उत्साहाने हजेरी लावली. 

Web Title: #Eid Muslims are reciting Namaz at the time of Ramadan Eidmah