पॅरोलवर सुटलेल्या कैद्याच्या स्वागत रॅलीत पोलिसच सहभागी; पोलिसासह आठ जणांना अटक 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 30 मे 2020

विश्रांतवाडी पोलिसांनी संबंधीत पोलिस कर्मचाऱ्यासह आठ जणांना शुक्रवारी रात्री अटक केली आहे. त्यांच्या ताब्यातून चार अलिशाना मोटारी, एक गावठी कट्टा, काडतूसे असा तब्बल 33 लाखाचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. या प्रकारामुळे पोलिस दलात एकच खळबळ उडाली आहे. 

 

पुणे : खूनाच्या गुन्ह्यात येरवडा कारागृहातून पॅरोलवर सुटलेल्या आरोपींच्या स्वागत रॅलीत पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयातील गुन्हे शाखेचा एक पोलिस कर्मचारी सहभागी झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
याप्रकरणी विश्रांतवाडी पोलिसांनी संबंधीत पोलिस कर्मचाऱ्यासह आठ जणांना शुक्रवारी रात्री अटक केली आहे. त्यांच्या ताब्यातून चार अलिशाना मोटारी, एक गावठी कट्टा, काडतूसे असा तब्बल 33 लाखाचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. या प्रकारामुळे पोलिस दलात एकच खळबळ उडाली आहे. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

पोलिस कर्मचारी शरीफ बबन मुलाणी (वय 36 रा. इंद्रायणीनगर भोसरी) , आझाद शेखलाल मुलाणी (वय 30, रा. तळवडे चिखली), आदेश दिलीप ओकाडे (वय 21 रा. सुयोग नगर, निगडी), मुबारक बबन मुलाणी (वय 38 रा. मोरेवस्ती चिखली), संदीप किसन गरुड (वय 40 रा. तळेगाव दाभाडे), हुसेन जाफर मुलाणी (वय 43), सिराज राजू मुलाणी (वय 22) आणि विनोद नारायण माने (वय 26 तिघेही रा. कोळवण मुळशी) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. याबाबत त्यांच्या विरुद्ध आर्म अॅक्टसह गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

पिंपरी चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक  माहितीनुसार, शुक्रवारी रात्री  खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी समीर मुलाणी व जमीर मुलाणी यांची येरवडा कारागृहातून पॅरोलवर सुटका करण्यात आली. या दोघांची सुटका होणार असल्याने त्यांचे  पिंपरी चिंचवड, मुळशी,भोसरी अणि चिखली परिसरातील भाऊ, नातेवाईक आणि मित्र  येरवडा कारागृह परिसरात एकत्र आले होते. आरोपी हे कारागृहातून बाहेर पडल्यानंतर 20 ते 25 दुचाकी व चारचाकी वाहनांतून रस्त्याने आरडाओरडा करत निघाले. विश्रांतवाडी पोलिस ठाण्यासमोरून समोरुन जात असताना हा प्रकार पोलिसांच्या लक्षात आला. त्यानंतर पोलिसांनी पाठलाग करून त्यांना फुलेनगर याठिकाणी अडवले. रॅलीत असलेल्या चारचाकी गाडीतून एक गावठी बनावटीचे पिस्तूल, काडतुसे व लोखंडी बार अशी शस्त्र जप्त करण्यात आली.

पुणे-मुंबईकरांना हवा वाढीव "डेटा'; सेंटरच्या मागणी 40 टक्के वाढणार

यापूर्वी देखील निघाल्या रॅली : 
कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर येरवडा कारागृहातून तात्पुरत्या जामीनावर आरोपींची पॅरोलवर सुटका करण्यात येते आहे. त्यामुळे त्यांना घेण्यासाठी येणारे समर्थक नातेवाईक यांची कारागृह परिसरात गर्दी होते आहे. रॅली काढण्यात आलेला हा काही पहिलाच प्रकार आहे असे नाही, यापुर्वी देखील सराईतांच्या मिरवणूका काढल्याच्या घटना शहरात घडल्या आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Eight people including police were arrested in pune for participate rally of prisoners on parole