आठ रेल्वे गाड्या पुण्यात येणार नाहीत

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 6 एप्रिल 2018

पुणे - सोलापूर-दौंडदरम्यान वाकव-माढा-वडसिंगे स्थानकांदरम्यान लोहमार्गाच्या दुहेरीकरणाचे काम होणार आहे. त्यामुळे मंगळवार (ता. १०)पर्यंत आठ रेल्वे गाड्या पुण्यात येणार नाहीत. त्या पर्यायी मार्गाने वळविणार असल्याचे मध्य रेल्वेच्या पुणे विभागाने कळविले आहे. 

नागरकोईल-मुंबई (क्र. १६३४०) ही गाडी ६ व ९ एप्रिल रोजी पुण्यात येणार नाही. नागरकोईल-मुंबई (क्र. १६३५२) रेल्वे गाडी ८ एप्रिल रोजी, मुंबई-नागरकोईल (क्र. १६३३९), ६ व ८ एप्रिल रोजी, मुंबई- नागरकोईल (क्र. १६३५१) ७ व १० एप्रिल रोजी, मुंबई-तिरुअनंतपुरम (क्र. १६३३१) ९ एप्रिल रोजी, चेन्नई-अहमदाबाद (क्र. १९४१९) ८ एप्रिल रोजी, तिरुअनंतपुरम-मुंबई (क्र. १६३३२) आणि अहमदाबाद-चेन्नई (क्र. १९४२०) या दोन्ही गाड्या ७ एप्रिल रोजी पुण्यात येणार नाहीत, असे रेल्वे प्रशासनाने कळविले आहे. 

Web Title: Eight trains will not come to Pune