नाटकांच्या तिकिट विक्रिला अभूतपूर्व प्रतिसाद

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 6 December 2020

या नाटकाची तिकीट विक्रीची तिन्ही ठिकाणची सुरवात पहिल्या रसिक प्रेक्षकांच्या हस्ते नारळ फोडून करण्यात आली. प्रशांत दामले व कविता लाड या दोन्ही कलावंतांनी पहिल्या प्रेक्षकांना तिकिटे देऊन केली.

वारजे माळवाडी - कोरोनाच्या काळानंतर पुण्यातील व्यायसायिक रंगभूमी सुरू होत असून या रंगभूमीवरील पडदा नऊ महिन्यानी उघडणार आहे. 'एका लग्नाची पुढची गोष्ट' या नाटकातील प्रशांत दामले व कविता लाड यांच्या भूमिका असलेले नाट्यप्रयोग १२ डिसेंबर रोजी पुण्यात होणार आहे. आज रविवारी कोथरूड, शिवाजीनगर व चिंचवड येथील नाट्यगृहातील खिडकीवरील तिकीट विक्रीला सुरवात झाली. 

या नाटकाची तिकीट विक्रीची तिन्ही ठिकाणची सुरवात पहिल्या रसिक प्रेक्षकांच्या हस्ते नारळ फोडून करण्यात आली. प्रशांत दामले व कविता लाड या दोन्ही कलावंतांनी पहिल्या प्रेक्षकांना तिकिटे देऊन केली. त्यापूर्वी तिकिट विक्री कार्यालयात देखील या कलाकाराच्या हस्ते पूजा झाली. रसिकाने दाखवलेल्या प्रेमामुळे कोथरूडच्या प्रयोगाची खिडकीवरील सर्व तिकिटांची विक्री झाली. तेथील ऑनलाइन तिकीट विक्री सुरू आहे. तसेच बालगंधर्व व मोरे सभागृह येथे देखील अपेक्षेपेक्षा जास्त प्रतिसाद मिळाला आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

नाट्यगृह सुरू होण्यासाठी अनेक दिवस प्रयत्न सुरू होते. त्याला यश आले. पुणे महानगरपालिकेचे पदाधिकारी व प्रशासनाने चांगले सहकार्य केले.  शहरातील कोथरूड येथील यशवंतराव चव्हाण नाट्यगृह, शिवाजीनगर येथील बालगंधर्व रंगमंदिर, सातारा रस्त्यावरील अण्णाभाऊ साठे नाट्यगृह, ही कलावंत व रसिकांसाठी सुसज्ज झाली आहेत. प्रेक्षक व कलावंतांची सर्व काळजी पालिकेच्या वतीने घेण्यात येणार आहे. 

या निमित्ताने पुणेकर रसिक व संवाद पुणे नाट्य संस्थांच्या वतीने प्रशांत दामले व कविता लाड यांचा सत्कार करण्यात आला. या वेळी संवादचे सुनील महाजन, समीर हंपी, प्रवीण बर्वे उपस्थित होते. सुनील महाजन यांनी पुणेकर रसिकांनी भरभरून प्रतिसाद द्यावा. असे आव्हान केले. 

आरोग्य विमा म्हणजे काय रे भाऊ? 60 टक्के नागरिकांना माहीतच नाही

कोरोनाच्या काळानंतर मागणी असलेल्या नाट्यगृहांची स्वच्छता करण्यात आली आहे. प्रत्येक प्रयोगाच्या अगोदर नाट्यगृह तेथील पालिकेच्या क्षेत्रीय कार्यालयाच्या माध्यमातून सॅनिटायझेशन, प्रेक्षकांच्या तापमानाची तपासणी, स्वच्छतागृहांची स्वच्छता केली जाणार आहे. तसे आदेश अतिरिक्त महापालिका आयुक्त सुरेश जगताप यांनी संबंधीताना दिले आहेत. सामाजिक अंतर पाळण्यासाठी नाटक पाहताना शेजारील खुर्ची रिकामी असेल. यामुळे सध्या तरी नाट्यगृहातील आसनव्यवस्था आहे. निम्म्यापेक्षा कमी जागेची तिकीट विक्री होईल.
-सुनील मते, सांस्कृतिक केंद्र, व्यवस्थापक महापालिका

पुणे- सातारा रस्त्यावर लोखंडी रोलिंगच्या अडथळ्यामुळे वाहतूक कोंडी

नाट्यगृह व आसनसंख्या
यशवंतराव चव्हाण नाट्यगृह- 892
बालगंधर्व रंगमंदिर- 990
रामकृष्ण मोरे चिंचवड- 1100

"अनलॉकनंतर नाटकाच्या पहिल्या प्रयोगाबाबत दोन्ही बाजूने खूप जोरदार प्रतिसाद आहे. आता आमची ही जबाबदारी वाढली आहे. मी पहिल्या प्रयोगाला जेवढी मेहनत घेतली होती. तेवढीच या प्रयोगाला घेतली आहे. पालिकेने नाट्यगृहात स्वच्छता व सॅनिटायझेशन केली आहे. प्रत्येकाने सामाजिक अंतर जबाबदारीने पाळले की, काहीच प्रॉब्लेम नाही. आता येणाऱ्या प्रत्येकाचे तापमान तपासले जाणार आहे. तुम्ही निरोगी म्हणून नाट्यगृहात आलात की तुमचे मनोरंजन करण्याची जबाबदारी आमची आहे. प्रेक्षकांना थेट live नाटक पाहता येणार आहे तसे आम्ही देखील नऊ महिन्यानंतर थेट live नाटक सादर करणार आहे. याची आम्हाला देखील उत्सुकता आहे. कोथरूडचे यशवंतराव चव्हाण, शिवाजीनगरचे बालगंधर्व रंगमंदिर व चिंचवडचे रामकृष्ण मोरे नाट्यगृहात मी प्रत्यक्ष जाऊन पाहणी केली आहे. पहिल्या नाटकानंतर प्रेक्षकांचा हळूहळू सर्व पूर्व पदावर येईल."
-प्रशांत दामले, अभिनेते


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Eka Lagnachi Goshta natak response to ticket sales