वाचून झालेले ज्ञान, चला करूया दान

eklavya.jpg
eklavya.jpg

पुणे : ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण मिळवून देण्यासाठी व सांस्कृतिक विकासासाठी दशकभरापासून कार्यरत असणाऱ्या एकलव्य सामाजिक विज्ञान बहुउददेशीय संस्थेकडून यंदा पुण्यात पुस्तक संकलन मोहिमेचे आयोजन करण्यात आले आहे. येत्या रविवारी, ३ नोव्हेंबरला फर्ग्युसन महाविद्यालयाच्या प्रवेशद्वारात जुनी पुस्तके, रद्दी, फर्निचर, कम्प्युटर तसेच कपाटे यांचे संकलन केले जाईल. 

गाव तिथे ग्रंथालय चळवळीसाठी चालवण्यात येणाऱ्या उपक्रमाचे हे तिसरे वर्ष आहे. विद्यार्थ्यांकडून विद्यार्थ्यांसाठी चालवण्यात येणाऱ्या या चळवळीमार्फत उच्च शिक्षणासाठी कार्यशाळा व युवा प्रेरणा केंद्रांत संसाधने उपलब्ध केली जातात. विविध शहरांतून आजवर घेण्यात आलेल्या पुस्तक संकलन मोहिमांमधून ३० हजाराहून जास्त पुस्तके विदर्भ, मराठवाडा, कोकण विभागातील ३० हुन अधिक ग्रंथालयांत पोचवली गेली आहेत. मागील दोन वर्षांपासून पुणेकरांनी या उपक्रमास भरभरून मदत केली आहे. राज्य सरकारच्या ट्रान्सफॉरमिंग महाराष्ट्र स्पर्धेत टीम एकलव्यला या कल्पनेसाठी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते 'पीपल्स चॉईस' पुरस्काराने गौरवण्यात आले होते.

नुकत्याच यवतमाळमधील घाटंजी येथे एकलव्य अकॅडमीची तीन दिवसीय राज्यस्तरीय कार्यशाळा पार पडली. वंचित घटकांतील ७० हून अधिक विद्यार्थ्यांनी यात सहभाग घेतला. एकलव्यमार्फत दुर्गम भागातील ४० हून अधिक विद्यार्थ्यांना यामार्फत टाटा समाजविज्ञान संस्था, अजीम प्रेमजी विद्यापीठ यांसारख्या संस्थांत प्रवेश मिळवून देण्यात यश आले आहे. 'संकलानातून मिळणाऱ्या मदतीतून हे उपक्रम विस्तारण्याचा व जनतेकडून लोकचळवळीसाठी पाठबळ मिळाल्यास महाराष्ट्रभर नेण्याचा संस्थेचा मानस आहे असे संस्थेचे अध्यक्ष राजू केंद्रे यांनी याप्रसंगी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com