Uddhav Thackeray: 'उद्धवचा वाटा, महाराष्ट्राचा घाटा'; शिंदे गटाकडून उद्धव ठाकरेंचा एकेरी उल्लेख

Eknath Shinde group criticized Uddhav Thackeray  In offensive language banner in pune
Eknath Shinde group criticized Uddhav Thackeray In offensive language banner in pune

पुणे : एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर सुरु झालेला उद्धव ठाकरे आणि शिंदे गटातील वाद संपण्याचे नाव घेताना दिसत नाहीये, राजकीय क्षेत्रात ठाकरे गट आणि शिंदे गट अनेक प्रसंगी एकमेकांसमोर उभे ठाकल्याचे पाहायला मिळाले आहे. दरम्यान महाराष्ट्रात येणारे उद्योग प्रकल्प गुजरातला गेल्याने पुन्हा एकदा आरोप प्रत्यारोपांना उधाण आले आहे. यातच पुण्यात बाळासाहेबांची शिवसेना म्हणजेच शिंदे गटाकडून बॅनरवर उद्धव ठाकरेंचा एकेरी उल्लेख केल्याचा प्रकार समोर आला आहे.

शिंदे गटाकडून पुणे शहरात लावण्यात आलेल्या बॅनरवर उद्धव ठाकरे यांचा एकेरी उल्लेख करण्यात आला असून ‘उद्धवचा वाटा, महाराष्ट्राचा घाटा’ असे बॅनरवर लिहून महाविकास आघाडीवर टीका करण्यात आली आहे.

बाळासाहेबांची युवा सेना पुणे शहरच्यावतीने पुण्यात बॅनरबाजी करण्यात आली आहे. प्रकल्प बाहेर राज्यात जाण्याला उद्धव ठाकरे जबाबदार असल्याचे सांगणारे बॅनर बालगंधर्व चौकात झळकवण्यात आले आहेत.

Eknath Shinde group criticized Uddhav Thackeray  In offensive language banner in pune
Gujrat Bridge Collapse: गुजरातमध्ये नदीत पूल कोसळल्याने आतापर्यंत 60 हून अधिक लोकांचा मृत्यू, अनेक बेपत्ता

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com