नारायणगावातील क्वारंटाइन व्यक्तीशी ज्येष्ठाने मारल्या गप्पा...  

quarantine
quarantine

नारायणगाव (पुणे) : जुन्नर तालुक्यातील नारायणगाव येथे संस्थात्मक विलगिकरण केलेल्या व्यक्तीशी गप्पा मारणाऱ्या ज्येष्ठ नागरिकावर नारायणगाव पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. त्यामुळे साथरोग नियमाचे उल्लंघन करणे येथील ज्येष्ठ व्यक्तीच्या अंगलट आले आहे.

नारायणगावलगत असलेल्या सावरगाव येथे चार व मांजरवाडी येथे एक, असे पाच रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. त्यामुळे मांजरवाडी व सावरगाव ही गावे कंटेन्मेंट झोन, तर खोडद व हिवरे तर्फे नारायणगाव ही दोन गावे  बफोर झोन म्हणून जाहीर करण्यात आली आहेत. नारायणगाव, वारुळवाडी परिसरातील बाजारपेठ बंद ठेवण्यात आली आहे. 

या भागात मागील तीन दिवसांत पाच जण कोरोना पॉझिटिव्ह आढळून आल्याने प्रशासनाची झोप उडाली असून, ग्रामस्थांमधून चिंता व्यक्त होत आहे. मात्र, काही बेजबाबदार व अतिउत्साही व्यक्तीमुळे साथरोग पसरण्याचा धोका निर्माण होत आहे. वारंवार सूचना देऊन देखील नियमाचे पालन होत नसल्याने पोलिस हतबल झाले आहेत. येथील डिंभे डावा कालव्यात अंघोळ करणाऱ्या बारा तरुणांवर  व तीन व्यापाऱ्यांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

खोडद येथील संस्थात्मक विलगिकरण केलेल्या व्यक्तीची माहिती घेण्यासाठी काल सायंकाळी पोलिस गेले होते. या वेळी भानुदास सीताराम गायकवाड  (वय ६५, रा. खोडद) ही व्यक्ती विलगिकरण केलेल्या चार व्यक्तींशी नियमांचे पालन न करता गप्पा मारताना आढळून आली. या प्रकरणी गायकवाड यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. या पुढे विनाकारण फिरण्यासाठी, मॉर्निंगवॉकसाठी बाहेर फिरणाऱ्यावर गुन्हे दाखल करण्यात येतील. 

याबाबत नारायणगाव पोलिस स्टेशनचे सहायक पोलिस निरीक्षक अर्जुन घोडे पाटील यांनी सांगितले की, कोरोनाचा धोका वाढल्याने नारायणगाव, वारुळवाडी परिसरात कालपासून लॉकडाउन करण्यात आला आहे. असे असताना रोज सकाळी व सायंकाळी लोक येथील बाह्यवळण रास्ता, गणपिरबाबा डोंगर, कॉलेज रोड परिसरात फिरण्यासाठी कुटुंबासह बाहेर पडत आहेत. या मध्ये काही प्राध्यापक, शिक्षक यांचा समावेश असतो. होम क्वारंटाइन असलेले काही जण बाहेर पडत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com