accident of old lady
accident of old lady

पुणे : भरधाव वाहनाने जोरदार धडक दिल्याने वृद्ध महिलेचा मृत्यू

पुणे : भरधाव वाहनाने वृद्ध महिलेस जोरदार धडक दिली. या अपघातात गंभीर जखमी झाल्याने महिलेचा मृत्यू झाला. ही घटना  नगर रस्त्यावरील रामवाडी जकात नाक्यासमोर घडली.

भागूबाई महादेव पंचमुख (वय ७०,रा. सिद्धार्थनगर, नगर रस्ता) असे या अपघातात मृत्यूमुखी पडलेल्या महिलेचे  नाव आहे. याप्रकरणी पोलीस कर्मचारी नितीन कांबळे यांनी येरवडा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मोटार चालका विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आठवड्यापूर्वी पंचमुख नगर रस्त्याने जात होत्या. रामवाडी जकात नाक्यासमोर त्या रस्ता ओलांडत असताना भरधाव वाहनाने त्यांना धडक दिली. अपघातानंतर मोटारचालक घटनास्थळी न थांबता पसार झाला. वाहनचालकाचा पोलिसांकडून शोध घेण्यात येत असून सहाय्यक पोलीस निरीक्षक बलभीम ननावरे तपास करत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com