शिक्षण समिती सभापतिपदासाठी 9 तारखेला निवडणूक 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 3 जुलै 2018

पिंपरी (पुणे) : महापालिका शिक्षण समिती सभापतिपदासाठी सोमवारी (ता. 9) दुपारी 1 वाजता महापालिका प्रशासकीय इमारतीतील महापौर मधुकर पवळे सभागृहात निवडणूक होणार आहे. महाराष्ट्र स्पर्धाक्षम कृषी विकास प्रकल्पाचे प्रकल्प संचालक सुशील खोडवेकर यांच्या अध्यक्षतेखाली ही निवडणूक होईल. विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी याबाबत आदेश दिले आहेत. 

शिक्षण समिती सभापतिपदासाठी 9 तारखेला निवडणूक घेण्याबाबत महानगरपालिका नगरसचिव विभागाने पत्रव्यवहार केला होता. संबंधित निवडणुकीसाठी घेण्यात येणाऱ्या विशेष बैठकीच्या अध्यक्षस्थानी विभागीय आयुक्त किंवा त्याचा प्रतिनिधी असावा, अशी कायद्यात तरतूद आहे. त्यानुसार पीठासीन अधिकारी खोडवेकर यांच्या अध्यक्षतेखाली ही निवडणूक होणार आहे. या निवडणुकीसाठी गुरुवारी (ता. 5) दुपारी 3 ते 5 या वेळेत नगरसचिव कार्यालयात सभापतिपदासाठी इच्छुक असलेल्या शिक्षण समितीतील नगरसेवकांनी अर्ज दाखल करायचे आहेत. शिक्षण समितीमध्ये भाजपचे 5, राष्ट्रवादी कॉंग्रेस 3 आणि शिवसेना 1 असे संख्याबळ आहे. त्यामुळे भाजपचाच सभापती होणार हे निश्‍चित आहे. 

 "शिक्षण समिती सभापतिपदासाठी 5 तारखेला समिती सदस्य असलेल्या भाजपच्या एका नगरसेवकाचे नाव निश्‍चित केले जाईल. त्यांचा अर्ज पक्षातर्फे भरण्यात येणार आहे.'' 
- एकनाथ पवार, सत्तारूढ पक्षनेते

Web Title: election on 9 june for education committee chairperson