सांस्कृतिक कार्यक्रमातही निवडणुकीचा प्रचार 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 24 ऑक्टोबर 2016

पुणे : ""महापालिकेच्या माध्यमातून जनतेची लहान-मोठी कामे दररोज करायची, असे भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांवर संस्कारच झालेले आहेत...'' असे पालकमंत्री गिरीश बापट यांनी रविवारी सांगितले. त्यामुळे आता सांस्कृतिक कार्यक्रमातही आगामी महापालिका निवडणुकीचा प्रचार रंगू लागल्याचे रसिकांना जाणवले. 

संवाद आणि प्रबोधन विचारधारा यांच्यातर्फे आयोजित दिवाळी सांस्कृतिक महोत्सवात ते बोलत होते. "विष्णुदास भावे पुरस्कार' जाहीर झाल्याबद्दल अभिनेते जयंत सावरकर यांचा बापट यांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला. शिवसेनेचे नेते शशिकांत सुतार, माजी आमदार चंद्रकांत मोकाटे, पृथ्वीराज सुतार, अभिनेते अविनाश खर्शीकर, "संवाद'चे सुनील महाजन, किरण साळी आदी उपस्थित होते. 

बापट म्हणाले, ""आम्ही दररोज कामे करतो, हे पुणेकरांना माहिती आहे. हे वेगळे सांगण्याची गरजच उरली नाही.'' सावरकर म्हणाले, ""गेली 61 वर्ष मी रंगभूमीवर काम करत आहे. याची दखल या पुरस्काराने घेतली गेली. याचा मनापासून आनंद आहे. उशिरा दखल घेतली, असे वाटत नाही. याआधी घेतली असती तर "लवकर दखल घेतली', असे म्हणता आले असते.'' संतोष चोरडिया यांनी सूत्रसंचालन केले. 

आगामी नाट्य संमेलनाची तयारी सुरू आहे. मला जर बिनविरोध अध्यक्षपद देणार असाल तरच मी या खुर्चीवर बसायला तयार आहे. या वयातही रंगभूमीसाठी बरेच काही करायचे आहे आणि ते मी करू शकतो. 
- जयंत सावरकर, अभिनेते 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: election campaign in cultural programs