आचारसंहिताभंगाच्या सर्वाधिक तक्रारी आंबेगावात

Prachar
Prachar

मंचर (पुणे) : पुणे जिल्ह्यात सर्वाधिक आचारसंहिता भंग झाल्याबाबतच्या तक्रारी आंबेगाव विधानसभा मतदारसंघात प्राप्त झाल्या आहेत. एकूण 39 तक्रारी आल्या आहेत. 13 तक्रारींत तथ्य आढळून आले नाही. 26 तक्रारींची कार्यवाही करण्यात आली. तीन तक्रारींबाबत संबंधितांच्या विरोधात मंचर व घोडेगाव पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल केले आहेत, असे निवडणूक निर्णय अधिकारी जितेंद्र डूडी व सहायक निवडणूक अधिकारी रमा जोशी यांनी सांगितले.

अवसरी खुर्द (ता. आंबेगाव) येथे तंत्रनिकेतन महाविद्यालयात शुक्रवारी (ता. 18) पत्रकार परिषद झाली. डूडी म्हणाले, "336 मतदान केंद्रांची संख्या असून एकूण मतदार दोन लाख 83 हजार 521 आहेत. त्यामध्ये पुरुष मतदारांची संख्या एक लाख 45 हजार 985 व स्त्री मतदारांची संख्या एक लाख 37 हजार 546 आहे. मतदान प्रक्रियेसाठी एकूण दोन हजार 114 अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या नियुक्‍त्या केल्या आहेत. मतदानाची प्रक्रिया व माहिती ताबडतोब उपलब्ध होण्यासाठी आदिवासी दुर्गम भागातील तळेघर व अडीवरे येथील नेटवर्क सेवा अखंडित सुरू ठेवली जाईल. त्यासाठी दोन्ही मनोऱ्यांजवळ तांत्रिक तज्ज्ञांच्या नियुक्‍त्या केल्या आहेत. रविवारी (ता. 20) ईव्हीएम मशिन, बॅलेट युनिट व व्हीव्हीपॅट आदी साहित्य व कर्मचारी एकूण 336 मतदान केंद्रांपर्यंत जाण्यासाठी 51 एसटी बसेस 33 जीपची व्यवस्था करण्यात आली आहे. मतदान केंद्रात उमेदवारांच्या निवडणूक प्रतिनिधींनी सोमवारी (ता. 21) सकाळी साडेपाच वाजता हजर राहणे आवश्‍यक आहे. त्यांच्या समक्ष ईव्हीएम मशिनचे प्रात्यक्षिक सादर केले जाईल. त्यानंतर मशिन झिरो केले जाईल.

"नऊ मतदान केंद्रांवर सूक्ष्म निरीक्षक'
निरगुडसर व लांडेवाडी या दोन गावांतील कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टिकोनातून पोलिस सूत्रांनी दिलेल्या अहवालानुसार नऊ मतदान केंद्रांवर सूक्ष्म निरीक्षकांच्या नियुक्‍त्या निवडणूक आयोगामार्फत केल्या आहेत. हे दोन निरीक्षक मतदान केंद्रांवर थांबणार असून निवडणूक शांततेत व सुरळीतपणे होण्यासाठी त्यांचा प्रयत्न राहील. तसेच येथे विशेष पोलिस बंदोबस्त तैनात केला जाईल, असे निवडणूक निर्णय अधिकारी जितेंद्र डूडी यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com