जुन्नर नगर परिषदेच्या प्रारूप मतदार यादीवर दहा प्रभागातून ३३७ हरकती - मनोज पष्टे

जुन्नर नगर परिषदेच्या प्रारूप मतदार यादीवर एकूण दहा प्रभागातून ३३७ हरकती नोंदविण्यात आल्या असल्याचे मुख्याधिकारी मनोज पष्टे यांनी सांगितले.
election news 337 objections from ten wards on draft voter list of Junnar Municipal Council Manoj Pashte pune
election news 337 objections from ten wards on draft voter list of Junnar Municipal Council Manoj Pashte punesakal

जुन्नर : जुन्नर नगर परिषदेच्या प्रारूप मतदार यादीवर एकूण दहा प्रभागातून ३३७ हरकती नोंदविण्यात आल्या असल्याचे मुख्याधिकारी मनोज पष्टे यांनी सांगितले. नगर परिषदेच्या आगामी निवडणुकीसाठी प्रभाग निहाय प्रारूप मतदार यादी मंगळवार ता.२१ रोजी प्रसिद्ध करण्यात आली होती. यादीवर आज सोमवार ता.२७ जून पर्यत हरकती व सूचना दाखल करण्याची शेवटची मुदत होती. या कालावधीत या हरकती दाखल झाल्या असून सर्वाधिक ९८ हरकती प्रभाग नऊ मध्ये तर सर्वात कमी प्रभाग एक मध्ये एक हरकत दाखल झाली आहे. प्रभाग सहा मध्ये एकही हरकत आली नाही.

प्रभाग निहाय दाखल हरकती पुढील प्रमाणे :- प्रभाग एक (१), प्रभाग दोन (६०), प्रभाग तीन प्रभाग(६१), प्रभाग चार(३०), प्रभाग पाच (१२), प्रभाग सहा (०), प्रभाग सात (६८),प्रभाग आठ (०४),प्रभाग नऊ (९८), प्रभाग दहा (०३) प्रारूप मतदार यादीत मयत तसेच दुबार मतदारांची नावे कमी करावीत.मतदार ज्या प्रभागात राहतात त्याच प्रभागात नोंदणी झाली आहे का याची प्रत्यक्ष पाहणी करून अंतिम मतदार यादी करण्यात यावी अशी मागणी सजग नागरी मंचाचे संस्थापक अध्यक्ष मधुकर काजळे यांनी केली आहे. प्रभाग निहाय प्रारूप मतदार यादीत प्रभाग रचनेनुसार मतदारांचे विभाजन करण्यात आले नाही.

प्रभागवार प्रत्यक्ष फिरून याद्या करण्यात आल्या नाहीत. यामुळे मतदान करताना मतदारांना अनेक अडचणींचा सामना करावा लागणार आहे.अनेक मतदारांची नावे सत्ताधाऱ्याच्या सूचनेनुसार सोईच्या प्रभागात समाविष्ट करण्यात आली आहेत. एक प्रभाग तीन हजार १० मतदारांचा तर शेजारचा प्रभाग अवघ्या एक हजार ९५० मतदारांचा असल्याने मतदार यादी अधिक पारदर्शक करावी अशी मागणी काजळे यांनी केली आहे. या हरकती वर निर्णय झाल्यानंतर अंतिम मतदार यादी १ जुलै रोजी प्रसिध्द करण्यात येणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com