प्रचारासाठी बांगड्या, हेअर क्‍लिप अन्‌ छल्ला!

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 22 जानेवारी 2017

पुणे - आगामी निवडणुकीची लगबग सुरू आहे. उमेदवार आणि कार्यकर्ते ‘लूक’कडे विशेष लक्ष देत आहेत. तिरंगी उपरणे, गांधी टोपी, खादी कपड्याच्या खरेदीत कार्यकर्ते मग्न आहेत. महिला कार्यकर्त्याही यात मागे नाहीत!

त्यांच्यासाठी राजकीय पक्षाचे चिन्ह असलेल्या हेअर क्‍लिप, साडी पीन, छल्ला यासारख्या ‘ॲक्‍सेसरीज’चा ट्रेंड सध्या बाजारात पाहायला मिळत आहे.

निवडणुकीसाठी विविध पक्षांचे उमेदवार प्रचाराची मोर्चेबांधणी करत आहेत. त्यासाठी आवश्‍यक प्रचार साहित्यही बाजारात दाखल झाले आहे. विविध राजकीय पक्षांचे झेंडे, तोरण, बॅच याबरोबरच पक्षाचे चिन्ह असलेले दुपट्टे, शाली, साड्याही बाजारात आल्या आहेत. याबरोबरच खास महिलांसाठी पक्षाचे चिन्ह असलेल्या अंगठ्या, कर्णफुले, छल्ला, साडी पीन, हेअर क्‍लिप, बांगड्या, ब्रेसलेट, घड्याळ अशा वस्तू बाजारात दिसत आहेत. राजकीय पक्षाचा झेंडा किंवा चिन्ह याला अनुसरून काही युवती आणि महिला कार्यकर्त्या नेल आर्ट करून घेत असल्याचेही दिसून येते.

राजकीय पक्षांच्या चिन्हांची प्रतिकृती, झेंडे, बिल्ले, फेटे असे साहित्य विक्रीला आहे. नेत्यांच्या सत्कारासाठी व्हीआयपी उपरणी हा वेगळा प्रकारही पाहायला मिळत आहे. तिरंगी गांधी टोपी, मानाचे फेटे, सत्कारासाठी शाल, कार्यक्रमाचे बॅच, कापडी झेंडे हे साहित्य बाजारात उपलब्ध आहेच. तसेच विशिष्ट नेत्यांच्या नावाच्या टोप्या, टी-शर्ट आणि रिबनदेखील मागण्यांनुसार तयार केल्या जात आहेत. याशिवाय मतदारांवर प्रभाव पाडण्यासाठी राजकीय नेत्यांचे मुखवटेही उपलब्ध आहेत, तसेच विविध पक्षांची प्लॅस्टिकची चिन्हे, पेन, महिला कार्यकर्त्यांसाठी विशिष्ट साड्या, स्टिकर्स, लहानमोठ्या आकाराचे झेंडे, जंबो झेंडे यांनाही चांगली मागणी आहे.

Web Title: election publicity equipments available in market