पुण्याच्या जागेवरून दोन्ही कॉंग्रेसमध्ये जुंपली 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 13 एप्रिल 2018

पुणे - पुणे लोकसभा मतदारसंघासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसकडे सक्षम उमेदवार आहे. त्याच बळावर ही निवडणूक राष्ट्रवादी कॉंग्रेस लढविणार असल्याचे मी म्हटले आहे. राष्ट्रवादीचे पुण्यात काम आहे आणि आमच्याकडे सक्षम उमेदवार असल्याशिवाय मी बोलत नाही, अशा स्पष्ट शब्दांत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते अजित पवार यांनी गुरुवारी पुन्हा एकदा पुण्यावर दावा केला. कॉंग्रेसने मात्र पुणे हा आमचा बालेकिल्ला आहे, हा मतदारसंघ आम्ही कदापिही सोडणार नाही, असे सांगितल्याने पुण्याच्या जागेवरून दोन्ही कॉंग्रेसमध्ये जुंपणार असे स्पष्ट झाले. 

वारज्यात झालेल्या हल्लाबोल मेळाव्यात पवार यांनी बुधवारी पुणे लोकसभा मतदारसंघाची निवडणूक राष्ट्रवादी कॉंग्रेस लढविणार असल्याचे जाहीर केले. त्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली. त्याची दखल घेत पवार यांनी पुन्हा एकदा पुण्यात राष्ट्रवादीच उमेदवार उभा करणार असल्याचे म्हटले आहे. ते म्हणाले, ""राष्ट्रवादीने शहरासाठी खूप काही केले आहे. पुण्यात कॉंग्रेसपेक्षा आमची ताकद जास्त आहे. आघाडी होईल की नाही, हे वरिष्ठ ठरवतील; पण लोकसभेसाठी उमेदवार राष्ट्रवादीचाच असेल.'' 

विधिमंडळाचा नेता मी व्हावे, असे सुप्रिया सुळे यांना वाटते. परंतु, राष्ट्रवादीमध्ये विधिमंडळाचा नेता निवडणुकीनंतरच आमदारांच्या बैठकीतच ठरतो, असेही त्यांनी सांगितले. भाजपचे उपोषण म्हणजे नौटंकी आहे. आमदार बाळा भेगडे आणि भीमराव तापकीर यांनी उपोषण सुरू असताना काही तरी खाल्ले, असे चॅनेलवर सुरू आहे. हे लोक उपोषण काय करतात, त्यांचे त्यांनाच माहीत, असे पवार यांनी म्हटले. 

भन्साळींच्या दाव्याची खिल्ली 
राष्ट्रवादीने पुण्यावर दावा केल्यावर कॉंग्रेसही बारामतीमध्ये उमेदवार उभा करणार, असे कॉंग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष देविदास भन्साळी यांनी म्हटले. त्यांच्या दाव्याची खिल्ली उडविताना ते म्हणाले, ""भन्साळी यांच्यामुळे बारामतीमध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेसचे डिपॉझिट जप्त होणार का', कॉंग्रेसच्या एका माजी अध्यक्षाने केलेला दावा आपण गांभीर्याने घेत नसल्याचे त्यांनी सांगितले. 

Web Title: Election of Pune Lok Sabha Constituency congress NCP