Election Results : विजयानंतर ‘अहों’नी गाठली दिल्ली! (व्हिडिओ)

पुणे - गिरीश बापट यांच्या विजयानंतर त्यांचा मुलगा गौरव व सून स्वरदा यांनी गुलाल उधळून सेल्फी काढून विजयोत्सव साजरा केला.
पुणे - गिरीश बापट यांच्या विजयानंतर त्यांचा मुलगा गौरव व सून स्वरदा यांनी गुलाल उधळून सेल्फी काढून विजयोत्सव साजरा केला.

गिरीश बापट यांच्या पत्नीची भावना; सूनबाईही भारावल्या
पुणे - ‘लोकांमध्ये जशी निकालाची उत्सुकता होती; तशी आमच्याही घरी होती... सकाळी ‘अहो’ मंत्री म्हणून घरातून बाहेर गेले अन्‌ खासदार म्हणून माझ्यापुढे आले..!’ हे कोडकौतुक आहे शनिवार पेठेत राहणाऱ्या गिरिजावहिनींचे; म्हणजेच गिरिजा गिरीश बापट यांचे! त्यासोबतच प्रचाराची रणनीती घरातून आखणाऱ्या त्यांच्या सूनबाई म्हणजे स्वरदा बापट... त्याही सासऱ्यांना मिळालेल्या मतांच्या आकडेवारीने भारावून गेल्या होत्या.

नगरसेवक, स्थायी समिती अध्यक्ष, आमदार, पालकमंत्री आणि कॅबिनेट मंत्री असे एक-दोन नव्हे; तर तब्बल चार दशके म्हणजे चाळीस वर्षे बापट यांनी राजकारणात दमदार ठसा उमटविला आहे. राजकीय मुत्सद्दीपणाच्या जोरावर आता त्यांनी दिल्ली गाठली आहे. त्यांच्या अभिनंदनासाठी कुटुंबीयांनी घरी खास तयारी केली होती. पुण्याचा निकाल जाहीर झाला तेव्हा निवडणुकीची उत्सुकता संपली आणि बापट यांच्या कुटुंबांत, कार्यकर्त्यांमध्ये जल्लोषाला प्रारंभ झाल्याचे पाहायला मिळाले. 

भाजपला मिळालेल्या यशाने विजयोत्सवाच्या ढोलांचे आवाज ठिकठिकाणी कानावर पडत होते. बापट यांच्या घरी व भाजप कार्यालयात सकाळपासून नव्या खासदाराच्या स्वागतासाठी लगबग सुरू होती. निकालाचा कौल साडेअकरानंतर बापट यांच्या नावाच्या दिशेने पुढे सरकत होता; तशी भाजप कार्यालयात कार्यकर्त्यांची गर्दी वाढत होती. तसेच, त्याचे कुटुंबीय गर्दीकडून होणाऱ्या अभिनंदनाचा स्वीकार करीत होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com