Election Results : डॉ. अमोल कोल्हे यांच्या विजयात लांडे यांचा वाटा

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 25 मे 2019

खासदार आढळराव पाटील यांनी विकासकामे न केल्याने मतदारांमध्ये त्यांच्याविषयी असलेल्या नाराजीचा फटका त्यांना बसला. पंतप्रधान मोदी यांच्याविषयीच्या सुप्त लाटेमुळेच अनेक उमेदवार विजयी झाले. त्या लाटेत खासदार आढळराव यांना स्वार होता आले नाही. शिरूर लोकसभा मतदारसंघात जुन्नर, खेड-आळंदी, आंबेगाव, शिरूर, भोसरी, हडपसर हे विधानसभा मतदारसंघ येतात. डॉ. कोल्हे यांच्या प्रचाराचा नारळही भोसरीत फोडण्यात आला. डॉ. कोल्हे यांच्या प्रचाराची सर्व जबाबदारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने विलास लांडे यांच्यावर सोपविली होती.

पिंपरी - शिरूर लोकसभा मतदारसंघातून काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस महाआघाडीचे उमेदवार डॉ. अमोल कोल्हे यांच्या विजयामध्ये माजी आमदार विलास लांडे यांचा सिंहाचा वाटा होता. 

खासदार आढळराव पाटील यांनी विकासकामे न केल्याने मतदारांमध्ये त्यांच्याविषयी असलेल्या नाराजीचा फटका त्यांना बसला. पंतप्रधान मोदी यांच्याविषयीच्या सुप्त लाटेमुळेच अनेक उमेदवार विजयी झाले. त्या लाटेत खासदार आढळराव यांना स्वार होता आले नाही. शिरूर लोकसभा मतदारसंघात जुन्नर, खेड-आळंदी, आंबेगाव, शिरूर, भोसरी, हडपसर हे विधानसभा मतदारसंघ येतात. डॉ. कोल्हे यांच्या प्रचाराचा नारळही भोसरीत फोडण्यात आला. डॉ. कोल्हे यांच्या प्रचाराची सर्व जबाबदारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने विलास लांडे यांच्यावर सोपविली होती. लांडे यांच्यासह पक्षाच्या नेत्यांनी पदयात्रा, रॅली काढून कोल्हे यांच्यासाठी वातावरण निर्मिती केली. भोसरी मतदारसंघातून त्यांना ८८ हजार २५९ मते मिळाली. दिलीप वळसे पाटील यांच्यासारख्या अनेक दिग्गज नेत्यांची फळी डॉ. कोल्हे यांच्या प्रचारासाठी राष्ट्रवादी काँग्रेसने प्रचारात उतरविली होती. 

‘बारा गावं दुसरी तवा एक गाव भोसरी’, असा नावलौकिक असणाऱ्या भोसरी विधानसभा मतदारसंघातून खासदार आढळराव यांना ३७ हजार ७७ मते मिळाली. शिवसेनेची मते आणि भाजपचे सहयोगी अपक्ष आमदार महेश लांडगे यांनी प्रामाणिकपणे पाळलेला युतीधर्म यामुळे खासदार आढळराव यांना या विधानसभा मतदारसंघातून एवढी आघाडी मिळाली. सहा विधानसभा मतदारसंघांपैकी याच मतदारसंघातून त्यांना एवढे मताधिक्‍य मिळाले. मात्र त्याचा उपयोग होऊ शकला नाही. डॉ. कोल्हे यांना मतदारसंघातील जातीय समीकरणांचाही फायदा झाला. 

पूर्वाश्रमीचे शिवसेनेचे उपनेते असलेले डॉ. अमोल कोल्हे यांच्या गळ्यात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यापासून केवळ ८४ दिवसांत खासदारकीची माळ पडली. मतदारांशी वैयक्तिक संपर्क साधण्यावर दिलेला भर, संभाजी महाराज मालिकेत त्यांच्या संभाजी महाराजांच्या भूमिकेविषयी असलेला आदर याचाही त्यांना फायदा झाला.

६,३५,८३० - डॉ. अमोल कोल्हे 
५,७७,३४७ - शिवाजीराव आढळराव
५८,४८३ - डॉ. अमोल कोल्हे यांचे मताधिक्‍य 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Election Results Shirur Constituency Amol Kolhe Win Vilas Lande Politics