Election Results : सोशल मीडियावर बारणेंचा विजयोत्सव

Social-Media
Social-Media

पिंपरी - मावळ लोकसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांचा दणदणीत विजय झाल्याने त्यांचा सोशल मीडियावर जोरदार विजयोत्सव सुरू आहे. तर प्रतिस्पर्धी व महाआघाडीचे उमेदवार पार्थ पवार यांनी आपला पराभव झाला असला तरी विश्‍वास दाखविणाऱ्या मतदारांचे, कार्यकर्त्यांचे व सहयोगी राजकीय पक्षांचे आभार मानले आहेत. पराभवाने खचून न जाता पुन्हा जोमाने कामाला लागण्याचा सल्ला अनेकांनी पार्थ यांना दिला आहे. 

खासदार बारणे यांच्या फेसबुक पेजवर विजयानंतरचा व्हिडिओ अपलोड केला असून, त्यांचे अनेकांनी अभिनंदन केले आहे. तर काहींनी भावी केंद्रीय मंत्री असाही उल्लेख केला आहे. विजयाचे व विविध आशय लिहिलेले संदेश व्हॉट्‌सॲप ग्रुपवर फिरत आहेत. 

दरम्यान, बारणे यांच्या फेसबुक पेजला एक लाख सहा हजार लाइक आहेत. तर पार्थ यांच्या फेसबुक पेजला ४७ हजार लाइक आहेत. त्यामुळे बारणे हे सोशल मीडियावरही पुढे असल्याचे जाणवते. 

पार्थला भावनिक आधार 
आपल्यावर विश्‍वास दाखवणाऱ्या मतदारांचे व राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, शेकाप, आरपीआय (कवडे गट) व स्वाभिमानी शेतकरी संघटना यांच्यासह मित्र पक्षांतील सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचे पार्थ यांनी आभार मानले आहेत. सामाजिक कार्य करण्यासाठी मी कायम कटिबद्ध आहे. निवडणुकीत जय-पराजय होत असतो. मात्र विचार कायम असतो, असे त्यांच्या फेसबुक पेजवरील पोस्टमध्ये म्हटले आहे. 

‘नवस पूर्ण नाही झाला म्हणून देव बदलणारे आम्ही नाही, आम्ही काल ही दादांसोबत होतो, आज ही आहे आणि उद्या ही राहणार,’’ असा मजकूर फेसबुकवर वाचायला मिळतो. ‘‘सहा पैकी पाच आमदार, दोन महापालिका, चार पैकी तीन नगरपालिका विरोधी पक्षाच्या असतानाही शत्रूच्या किल्ल्यात जाऊन आयुष्यातील पहिली निवडणूक लढविणाऱ्या २७ वर्षांच्या पार्थमध्ये धमक आहे,’’ अशाही प्रतिक्रिया वाचायला मिळतात.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com