वडगाव नगरपंचायतीसाठी उद्या मतदान

ज्ञानेश्वर वाघमारे
शनिवार, 14 जुलै 2018

वडगाव मावळ (पुणे) : नवनिर्मित वडगाव नगरपंचायत निवडणूकीसाठी रविवारी (ता.15) मतदान होणार आहे. नगराध्यक्ष पदासाठी सहा तर नगरसेवक पदाच्या 17 जागांसाठी 47 असे एकूण 53 उमेदवार रिंगणात आहेत.

वडगाव मावळ (पुणे) : नवनिर्मित वडगाव नगरपंचायत निवडणूकीसाठी रविवारी (ता.15) मतदान होणार आहे. नगराध्यक्ष पदासाठी सहा तर नगरसेवक पदाच्या 17 जागांसाठी 47 असे एकूण 53 उमेदवार रिंगणात आहेत.

निवडणूकीत भाजप-आरपीआय युती, राष्ट्रवादी, स्वाभिमानी रिपब्लिकन पार्टी व अपक्ष यांची पोटोबा महाराज नगरविकास आघाडी तसेच काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस,शिवसेना यांची वडगाव-कातवी नगरविकास समिती अशी तिरंगी लढत होत आहे. भाजप-आरपीआय युतीने नगराध्यक्षपदासह सोळा, वडगाव-कातवी नगरविकास समितीने नगराध्यक्षपदासह तेरा, पोटोबा महाराज नगरविकास आघाडीने नगराध्यक्षपदासह पंधरा उमेदवार रिंगणात उतरवले आहेत. काही अपक्ष उमेदवारही निवडणूक लढवत आहेत. या तीनही पॅनेलने निवडणूक प्रतिष्ठेची करुन गेल्या बारा दिवसात जोरदार प्रचार मोहिम राबवली. त्यामुळे नगरपंचायतीचा पहिला नगराध्यक्ष कोण होणार याबाबत संपूर्ण तालुक्यात उत्सुकतेचे वातावरण आहे.

Web Title: election for wadgao nagarpanchayat tomorrow