चिंचवडमध्ये पाच तासांपासून वीजपुरवठा खंडीत 

संदीप घिसे
सोमवार, 3 डिसेंबर 2018

पिंपरी (पुणे) केबलमध्ये बिघाड झाल्यामुळे सोमवारी सकाळी पावणे सहा वाजल्यापासून चिंचवडगाव परिसरातील वीजपुरवठा खंडित झाला आहे.

चिंचवडगाव परिसरातील तानाजीनगर, काकडे पार्क इत्यादी परिसरातील वीजपुरवठा सोमवारी सकाळी पावणेसहा वाजताच्या सुमारास खंडित झाला. सकाळी पावणे अकरा वाजेपर्यंत वीजपुरवठा सुरळीत झालेला नाही.

याबाबत बोलताना महावितरणचे अधिकारी महतो म्हणाले की, काकडे पार्क परिसरात केबलमध्ये फॉल्ट झाल्यामुळे वीजपुरवठा खंडित झाला आहे. मात्र केबलमधील फॉल्ट अद्याप सापडलेला नाह। याबाबत काम सुरू असून येत्या तीन तासात वीजपुरवठा सुरळीत केला जाईल.

Web Title: Electric Supply Close in Chinchwad