महिनाभर अंधारात असलेले कळकराईला गाव अखेर उजळले

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 3 जुलै 2018

टाकवे बुद्रुक (पुणे) : खोल दरीत जीवावर उदार होऊन महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी वीजवाहक तारा जोडल्याने महिनाभर अंधारात असलेली कळकराई प्रकाशाने उजळली. दोन जूनला वादळी वाऱ्यासह मान्सूनपूर्व पावसात कळकराईला जोडणा-या वीजवाहक तारा दरीत तुटल्यामुळे महिनाभर कळकराई कर अंधारात होते. नागरिकांची होणारी गैरसोय सकाळने मांडली होती. 

टाकवे बुद्रुक (पुणे) : खोल दरीत जीवावर उदार होऊन महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी वीजवाहक तारा जोडल्याने महिनाभर अंधारात असलेली कळकराई प्रकाशाने उजळली. दोन जूनला वादळी वाऱ्यासह मान्सूनपूर्व पावसात कळकराईला जोडणा-या वीजवाहक तारा दरीत तुटल्यामुळे महिनाभर कळकराई कर अंधारात होते. नागरिकांची होणारी गैरसोय सकाळने मांडली होती. 

वास्तविक कळकराई आंदर मावळातील अत्यंत दुर्गम, डोंगराळ गाव. सह्याद्रीच्या डोंगरात मध्यावर हे गाव आहे. गावाला जोडणाऱ्या वीजपुरवठा दऱ्या खोऱ्यात गेला आहे. अतिशय खोल, अरूंद दरीत आहे. काताळ पाषण असल्याने वीजवाहक खांबाचे अंतर अधिक आहे. त्यामुळे वादळी वाऱ्यात हेलकावे खावून वीज पुरवठा खंडित होत असतो. या वर्षी पहिल्याच वादळात तारा तुटून पडल्या, गाव अंधारात होता.

महावितरणचे उपकार्यकारी अभियंता विजय जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली शाखा अभियंता शाम दिवटे यांनी स्थानिक गावकरी आणि महावितरणच्या कर्मचाऱ्यांना सोबत घेऊन  दोन दिवसात तुटलेल्या तारा जोडल्या आणि वीज पुरवठा सुरू केला. पण यासाठी महिनाभराचा अवधी गेला. तुटलेल्या तारात बरेच अंतर होते. दोन वीजवाहक खांबाची जोडणी दीड ते दोन किलोमीटर पर्यंत असावी. त्यात खोल दरीत, पावसाने निसरडी झालेले जमीन. खाली पाहावे तर यमसदनच आठवते. अशा जोखमीच्या ठिकाणी कामाला महावितरणने खास टीम आणली होती. ठाकर समाजातील धाडसी तरूणांनी हे आवाहन पेलून काम केले. जोखमीच्या कामात सबंधित अधिकारी डोळ्यात तेल घालून देखरेख करीत होते.

महावितरणच्या कामाबद्दल सतत तक्रारी होत असतात, पण इतके मोठे जोखमीचे काम केल्याने महावितरण कौतुकाला पात्र झाले आहे. माजी सरपंच लक्ष्मण कावळे व चंद्रकांत कावळे म्हणाले, "गावकऱ्यांनी खारीच्या वाट्या प्रमाणे मदत केली. पण महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी जीव धोक्यात घालून काम केले, त्यांच्या धाडसी कामाला सलाम. कार्यकारी अभियंता विजय जाधव म्हणाले, "दुर्गम भागातील वीजपुरवठा नियमितपणे सुरू रहावा यासाठी आम्ही सतत प्रयत्नशील आहोत, पण निसर्गाशी झुंज देत काम करताना काही अडथळे येतात हा वास्तव स्वीकारले पाहिजे. पण या पुढे वीज पुरवठा नियमित सुरू राहण्यासाठी आमचे प्रयत्न राहतील. 

Web Title: electricity after a month in kalkarai in takawe bdk