वीजबिल ऑनलाइन भरून मिळवा दहा रुपयांची सूट!

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 30 नोव्हेंबर 2018

पुणे - महावितरणने ऑनलाइन वीजबिल भरणाऱ्या ग्राहकांना दिलासा दिला आहे. छापीलऐवजी ई-मेल व एसएमएसचा पर्याय स्वीकारून वीजबिलाचा भरणाऱ्या ग्राहकांना १ डिसेंबरपासून प्रतिबिल दहा रुपये सवलत देण्याचा निर्णय घेतला आहे. वीजबिलाची माहिती व वीजबिल भरण्यासाठी मोबाईल ॲप किंवा www.mahadiscom.in या संकेतस्थळावरून ऑनलाइनसह विविध पर्याय उपलब्ध करून देण्यात आले आहेत.

पुणे - महावितरणने ऑनलाइन वीजबिल भरणाऱ्या ग्राहकांना दिलासा दिला आहे. छापीलऐवजी ई-मेल व एसएमएसचा पर्याय स्वीकारून वीजबिलाचा भरणाऱ्या ग्राहकांना १ डिसेंबरपासून प्रतिबिल दहा रुपये सवलत देण्याचा निर्णय घेतला आहे. वीजबिलाची माहिती व वीजबिल भरण्यासाठी मोबाईल ॲप किंवा www.mahadiscom.in या संकेतस्थळावरून ऑनलाइनसह विविध पर्याय उपलब्ध करून देण्यात आले आहेत. या सुविधा उपलब्ध असतानाही महावितरणतर्फे ग्राहकांना छापील वीजबिलही उपलब्ध करून देण्यात येते; १ डिसेंबरपासून प्रतिबिल दहा रुपये सवलत मिळणार असल्याचे आदेश महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक संजीव कुमार यांनी काढले आहेत. गो-ग्रीनचा पर्याय निवडण्यासाठी ग्राहकांनी आपल्या वीजबिलावरील गो-ग्रीन क्रमांकाची नोंदणी महावितरणच्या मोबाईल ॲपद्वारे अथवा महावितरणच्या  स्थळ https://billing.mahadiscom.in/gogreen.php या संकेतस्थळावर जाऊन करावी लागणार आहे.

छपाई, वाटपासाठी दहा रुपयांचा खर्च
राज्यात महावितरणचे सुमारे २ कोटी ४० लाख ग्राहक आहेत. त्यापैकी १ कोटी ४० लाख ग्राहकांचे मोबाईल नंबर महावितरणकडे उपलब्ध आहेत. या सर्व ग्राहकांना या योजनेचा लाभ घेणे शक्‍य होणार आहे, तर बिल छापण्यासाठी आणि वाटप करण्यासाठी महावितरणला प्रतिबिल दहा रुपये खर्च येतो. 

Web Title: Electricity Bill Online Concession