वीज देयक भरल्याची पावती कोऱ्या कागदावर

Mahavitaran
Mahavitaran

पुणे - वीज देयक भरल्यानंतर सध्या मिळणाऱ्या पावत्यांऐवजी संगणकीकृत पद्धतीने कोऱ्या कागदावर पावत्या छापून दिल्या जाणार आहेत. वीज देयक भरणा, वेळ व खात्यात स्पष्टता यावी, यासाठी महावितरणकडून पुणे शहरात सोमवारपासून कोऱ्या कागदावर पावत्या छापून मिळणार आहेत.

पावतीवर संगणकीकृत क्रमांक मिळणार आहे. त्याद्वारे ऑनलाइन किंवा मोबाईल ॲपच्या माध्यमातून वीज देयक भरल्याची खात्री ग्राहकांना करता येणार आहे. ग्राहकांनी भरणा पावतीवर संगणकीकृत क्रमांक असल्याची खातरजमा करावी व संगणकीकृत पावतीशिवाय वीजबिल भरू नये. त्याचबरोबर फसवणूक टाळण्यासाठी हस्तलिखित पावत्या नाकाराव्यात, असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com