रिडिंगशिवाय मोघम वीजबिलांचे वाटप 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 23 जुलै 2018

चिखली - घरगुती वीज ग्राहकांना रिडिंग न घेताच मोघम वीजबिले दिली जात आहेत. महावितरणच्या या मनमानी आणि अनागोंदी कारभाराचा फटका नागरिकांना बसत आहे. मोघम वीजबिल देणे बंद करून महावितरणने आर्थिक व मानसिक पिळवणूक थांबवावी, अशी मागणी नागरिकांनी केली. 

चिखली - घरगुती वीज ग्राहकांना रिडिंग न घेताच मोघम वीजबिले दिली जात आहेत. महावितरणच्या या मनमानी आणि अनागोंदी कारभाराचा फटका नागरिकांना बसत आहे. मोघम वीजबिल देणे बंद करून महावितरणने आर्थिक व मानसिक पिळवणूक थांबवावी, अशी मागणी नागरिकांनी केली. 

महावितरणने मीटर रिडिंग घेण्यासाठी ठेकेदार नेमले आहेत. परंतु, अनेकदा रिडिंग घेतले जात नाही. रिडिंगचा फोटो बिलावर येणे बंधनकारक आहे. मात्र, तो भाग काळा दिसतो. महावितरणच्या थरमॅक्‍स चौकातील कार्यालयाकडून मीटर रिडिंगची शहानिशा न करताच मोघम बिले दिले जातात. त्यामुळे ग्राहकांची आर्थिक पिळवणूक होते. याबाबत असंख्य ग्राहकांच्या तक्रारी आहेत. परंतु, या कार्यालयाकडून दखल घेतली जात नाही. माहिती आधिकारी कार्यकर्ते किशोर तेलंग यांनी महावितरणकडे लेखी तक्रार केली. तक्रारीनुसार मोरेवस्तीतील लता मोरे यांचे घरगुती मीटर सुरू आहे. मात्र, पाच महिन्यांपासून त्यांच्या मीटरचे रिडिंग घेतलेले नाही. त्यांच्या गेल्या चार महिन्यांच्या बिलांवर 11001 युनिट एवढे रिडिंग दाखविले आहे. मात्र, त्यांच्याकडून चार महिन्यांचे प्रत्येकी 1940, 1750, 1720, 3630 रुपये याप्रमाणे वीजबिल वसूल केले आहे. मोरे यांनी विनंती करूनही त्यांचे मीटर रिडिंग घेतलेले नाही. 

थरमॅक्‍स चौकातील विभागीय कार्यालयातील आधिकाऱ्यांना सांगून योग्य ती कार्यवाही करण्यात येईल. त्यानंतर नागरिकांना मीटर रिडिंगनुसारच वीजबिल येईल. 
मदन शेवाळे, कार्यकारी अभियंता, महावितरणचा भोसरी विभाग 

Web Title: electricity bill without reading

टॅग्स