योग्य वेळी जाग आल्याने वाचला जीव...

म्हस्कू खवले
गुरुवार, 12 जुलै 2018

पुणे: कोंढवा-कात्रज रस्त्यावर बौद्ध विहार अपार्टमेंट मध्ये आज (गुरुवार) सकाळी एका घरामधे आगीची घटना घडली. घरात असलेल्या मुलाची सावधगिरी व अग्निशमन दलाच्या जवानांनी वेळीच आग आटोक्यात आणल्याने धोका टळला.

सकाळी बौद्ध विहार अपार्टमेंट मध्ये पहिल्या मजल्यावर आग लागल्याने अग्निशमन दलाच्या नियंत्रण कक्षाला रहिवाशी ऋषिकेश मोरे या पंधरा वर्षीय मुलाने सतर्कता दाखवित माहिती कळविली व तिथेच राहात असलेले जवान गणपत पडये यांची मदत मोलाची ठरली.

दलाकडून लगेच कोंढवा बुद्रुक अग्निशमन वाहन व देवदूत क्विक रिस्पॉन्स टिम घटनास्थळी दाखल झाली. पहिल्या मजल्यावर असणाऱ्या घरामधे दुरचित्रवाणी संच, कपाट, वायरिंग व इतर घरगुती वापराच्या साहित्याने पेट घेतला होता. जवानांनी ताबडतोब घरामधे पाण्याचा मारा करत दहा मिनिटात आग पुर्ण आटोक्यात आणली. घरामध्ये कोणी अडकले अथवा जखमी नसल्याची खात्री केली. त्याचवेळी तिथे असलेले जवान गणपत पडये यांची सतर्कता महत्वाची ठरली.

घरात भाडेकरु असलेला मुलगा ऋषिकेश मोरे (वय १५) याने सांगितले की, 'मी झोपलो असताना अचानक काहीतरी जळत असल्याचा वास आल्याने मी जागा झालो. घरातील वीज गेली असून, काही वस्तू जळाल्याचे दिसले. तातडीने अग्निशमन दलास याबाबतची माहिती कळविली व जवानांनी कामगिरी चोख बजावली. मला जाग आली नसती तर काहीतरी विपरित घडले असते.'

कोंढवा अग्निशमन केंद्राचे तांडेल सुभाष जाधव, गणपत पडये, चालक सुखदेव गोगावले, जवान संग्राम देशमुख, विशाल यादव आणि देवदूत क्विक रिस्पॉन्स टिमचे अंबादास घनवट, प्रदिप कोकरे, अविनाश लांडे आदी सहभागी होते.

Web Title: electricity fire on kondhwa road in pune