गॅसद्वारे वीजनिर्मिती

Electricity
Electricity

पिंपरी - वीजपुरवठा खंडित झाला की, आयटी कंपन्यांमधील डेटा सेंटर्सचे कामकाज बऱ्याचदा ठप्प होण्याचे प्रकार घडतात. त्यावर उपाय म्हणून पाइपलाइन गॅसच्या माध्यमातून विजेची निर्मिती करून त्याचा पुरवठा आयटी कंपन्यांना करण्यात येणार आहे. महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेडने (एमएनजीएल) हा अनोखा उपक्रम हाती घेतला आहे. हिंजवडीतील आयटी कंपन्यांना अखंडितपणे वीज पुरविण्याचे नियोजन करण्यात आले आहे.

बेंगळुरूमध्ये उपक्रम सुरू 
गॅसच्या माध्यमातून विजेची निर्मिती करण्याचा उपक्रम बेंगळुरूमधील एका आयटी कंपनीमध्ये सुरू आहे. कंपनीच्या डेटा सेंटरला त्याचा चांगला फायदा होत आहे. गॅसच्या माध्यमातून तयार होणारी वीज स्वस्त दरात उपलब्ध होत असल्यामुळे हिंजवडीतील आयटी कंपन्यांसाठी ते फायदेशीर ठरणार आहे. टर्बाइनच्या माध्यमातून या विजेची निर्मिती करण्यात येणार आहे. 

कॅंटीनमध्येही वापर शक्‍य
आयटी पार्कमधील कंपन्यांची पाइपलाइन गॅससाठी मागणी आहे. आयटी पार्कचा परिसर ग्रामपंचायतीच्या अखत्यारित येत असल्याने एमएनजीएलने त्याठिकाणी अद्याप कामाला सुरवात केलेली नाही. पुढील वर्षभरात आयटी कंपन्यांपर्यंत पाइपलाइन गॅसची सुविधा पोचविण्याचे नियोजन आहे.

 बहुतेक आयटी कंपन्यांमध्ये कॅन्टीनची सुविधा आहे. त्याठिकाणी अन्नपदार्थ तयार करण्यासाठी एलपीजी गॅसचा वापर केला जातो. दिवसाला सात हजार किलो एलपीजी गॅसचा वापर होतो. एलपीजी गॅसच्या तुलनेत स्वस्त असल्यामुळे या कंपन्यांना पाइपलाइन गॅसचा वापर करणे आर्थिकदृष्ट्याही फायदेशीर ठरणार आहे. 

पाइपलाइन गॅसच्या माध्यमातून तयार होणाऱ्या विजेचा वापर करणे आयटी कंपन्यांना फायदेशीर ठरणार आहे. हिंजवडीतील आयटी कंपन्यांनी त्यांची मागणी नोंदविली आहे. त्यामुळेच एमएनजीएलने हा उपक्रम हाती घेतला आहे. येत्या वर्षभरात त्याला सुरवात होईल.
- अरविंद तांबेकर, व्यवस्थापकीय संचालक, एमएनजीएल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com