पुणे : कळकराईच्या वीज प्रश्नाकडे सरकारचे लक्ष नाही; ग्रामस्थांचा आरोप

Electricity
Electricity

टाकवे बुद्रुक- दोन वर्षापासून बंद असलेली कळकराईची वीज,महावितरणे भर पावसात जोखीम पत्करून जुलै महिन्यात सुरू केली.पण वीजेचा लखलखाट फक्त आठच दिवस राहिला आणि पुन्हा कळकराई अंधारात बुडून गेली. या स्वातंत्र्यदिनी सर्व स्वातंत्र्यदिनाच्या आनंदात सहभागी असताना महावितरणचे कर्मचारी भर पावसात दरी खोऱ्यात कळकराईत वीज वाहक तारा खेचून गावाला प्रकाश जोडून देत होते.

महावितरणचे हे देखील कष्ट फोल ठरले. फक्त एकदा चमकलेली वीज पुन्हा गायब झाली आणि गाव काळोख्यात बुडाले. 'सकाळ'च्या पुढाकाराने तळेगावचे नगरसेवक गणेश खांडगे यांनी एक वर्षापूर्वी दिलेले सौरदिवे मिणमिणत आहे, त्याच उजेडावर गाव जागा आहे. सतत पडणाऱ्या पावसामुळे सौरदिवे कमी अधिक प्रमाणात चार्ज होत आहे.
महावितरणने खोल दरीत जिगरबाज कर्मचाऱ्यांच्या भरवशावर जुलै महिन्यात सुरू केली वीज आठ दिवसात बंद पडली ती आज पर्यत बंदच आहे कळकराई चे गावकरी या त्रासला अक्षरक्ष: कंटाळले आहेत.

सर्व लोकप्रतिनिधी,अधिकारी यांना सांगूनही झाले ,निवेदने लिहुन गावकऱ्यांच्या सह्या देऊन कार्यालयात जमा केले तरीही काही सरकारच लक्ष नाही असा आरोप चंद्रकांत कावळे यांनी केला. कळकराईला सावळयातून वीज पुरवठा होतो. हे अंतर खूप आहे. वीजवाहक तारा एकमेकांना स्पर्श होतात. त्याने वीज पुरवठा खंडीत होतो. कळकराईला कर्जत तालुक्यातील मोग्रज जवळील चौधरवाडी पासून वीजपुरवठा करता येईल. हे अंतर अवघे तीन किलोमीटर आहे,त्यामध्ये  घाटाची मोठी चढण नाही. त्यामुळे याही पर्यायाचा महावितरणने विचार करावा अशी मागणी गावातील चंद्रकात कावळे, सोमनाथ तळपे, हरिचंद्र वासावे, मारुती दाते,कविता कावळे, अनिता तळपे,अरुणा वासावे, अलका लाडके, मीनाक्षी दाते, सुलाबाई लाडके, लता काठे, वनिता भवरी, रंजना लाडके आदि महिला पुरूषांनी केली आहे. वडगाव मावळचे उपअभियंता विजय जाधव म्हणाले,"सावळयातून कळकराईला जोड दिल्याने अंतर अधिक आहे, वीज पुरवठा सुरळित करण्यासाठी प्रयत्न सुरू आहे. मोग्रज वरून पर्यायी लाईन जोडण्यासाठी सावळा ग्रामपंचायतीने विहीत नमुन्यात प्रस्ताव द्यावा तसेच मोग्रज येथील वीज बिल जोडावे हा प्रस्ताव वरिष्ठ पातळीवर मंजूर करून कळकराईची समस्या कायम मिटविण्यासाठी तोडगा काढता येईल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com