विजेच्या लपंडावाने नागरिक त्रस्त

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 19 जानेवारी 2019

पुणे - कोंढवा खुर्द येथील सवेरा ग्रीन पार्क परिसरात सोमवारपासून विजेचा लपंडाव सुरू असून, सलग चार दिवस वीजपुरवठा मधूनच खंडित होत असल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत.

सवेरा ग्रीन  पार्क परिसरात २०० के.व्ही.चा ट्रान्स्फॉर्मर आहे. यामधून सवेरा पार्कसह  फ्लोरिडा, हिल व्ह्यू,  ग्रीन वूड, खान मंजील, एम. एम. पॅलेस  या सोसायट्यांसह ३० सोसायट्या व १२६० घरांना वीज दिली जाते. वीजवाहक तारा खराब झाल्याने गेले चार दिवस वीजपुरवठा खंडित  होत आहे. वीज गेली की केबल नव्याने आणून बसवण्यासाठी सहा ते सात  तास वेळ लागत आहे.

याबाबत हाजी वसीम तारकश, कासम ख्वाजा, मुनीर शेख, सलीम पठाण, युनूस शेख  आदींनी वीज महावितरण कंपनीच्या कार्यालयात जाऊन तक्रार केली. अनेक वेळा तक्रार करुनही येथील केबल जास्त क्षमतेची टाकली जात नाही. त्यामुळे वीज वारंवार  जाते. फ्यूज बॉक्‍स पूर्ण उघडे असून, त्याला दारे नाहीत. त्यामुळे येथे अपघाताचीही शक्‍यता निर्माण झाली आहे.

Web Title: Electricity Issue Public