मानवटवस्तीत एप्रिलमध्ये ‘दिवाळी’

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 20 एप्रिल 2018

भोर - तालुक्‍याच्या हिर्डोशी खोऱ्यातील अतिदुर्गम भागात असलेल्या दुर्गाडी-मानवटवस्ती येथे प्रथमच वीज आल्याने नागरिकांनी आनंदोत्सव साजरा केला. महावितरणने पंडित दीनदयाळ उपाध्याय ग्राम ज्योती योजनेतून ४५ लाख ५० हजार रुपये खर्च करून मानटवस्तीतील १४ घरांना मंगळवारी (ता. १७) नव्याने वीजजोड दिले.

महावितरणचे भोरचे उपकार्यकारी अभियंता संतोष चव्हाण यांच्या उपस्थितीत वीजजोडणी सुरू करण्यात आली. भोर-महाड मार्गावरील वरंध घाटातील मोहनगडाच्या पायथ्याशी असलेल्या मानटवस्तीत १५० लोकसंख्या आहे.

भोरपासून ५८ किलोमीटर मानटवस्तीतील कौलारू घरात राहणाऱ्या रहिवाशांचा उदरनिर्वाह पावसाळी शेतीवर आणि मोलमजुरीवर अवलंबून आहे. वस्तीवर जाण्यासाठी कच्चा रस्ता व वीज नसल्याने रहिवाशांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता.

महावितरणच्या बारामती परिमंडलाचे मुख्य अभियंता नागनाथ इरवाडकर, अधीक्षक अभियंता दत्तात्रय पडळकर, पायाभूत आराखडा विभागाचे अधीक्षक अभियंता भाऊसाहेब इवरे, सासवडचे कार्यकारी अभियंता केशव काळुमाळी यांच्या मार्गदर्शनाखाली भोरचे उपकार्यकारी अभियंता संतोष चव्हाण, हिर्डोशीचे शाखा अभियंता विजय होळकर, प्रधान तंत्रज्ञ अशोक कुऱ्हाडे, वरिष्ठ तंत्रज्ञ जयसिंग तुंगतकर तसेच महावितरणचे कंत्राटदार सुरेंद्रकुमार अग्रवाल व त्यांच्या कर्मचाऱ्यांनी मानट वस्तीवर वीज पोचवण्यात मोलाचा वाटा उचलला.

आम्हाला आजपर्यंत रॉकेलवर चालणाऱ्या दिव्यांच्या प्रकाशात रात्र काढावी लागे. रॉकेल आणायलाही दुर्गाडीपर्यंत ४ ते ५ किलोमीटरची पायपीट करावी लागे. आता आमची अडचण दूर झाली असल्याचे स्थानिकांनी सांगितले.

बैलगाडी, शिकाळीतून साहित्याची वाहतूक
वस्तीपर्यंत वीज नेण्यासाठी पायाभूत सुविधा उभारून तब्बल ६३ उच्चदाब वाहिनीचे खांब, ६९ लघुदाब वाहिनीचे खांब रोवण्यात आले. दुर्गाडीपासून मानट वस्तीपर्यंत ९ किलोमीटर वीजवाहिनी उभारण्यात आली. वस्तीवर १०० केव्हीए क्षमतेचे एक वितरण रोहित्र बसविले. डोंगराळ भाग असल्याने बऱ्याच ठिकाणी रस्ता नसला तरीही खांब नेण्याचे मोठे आव्हान पेलून महावितरण व कंत्राटदारांच्या कर्मचाऱ्यांनी हे काम पूर्ण केले. काही ठिकाणी विजेचे खांब शिकाळी करून खांद्यावरून वाहून नेले. हे काही अंतर रोहित्र बैलगाडीतून नेण्यात आले. जिथे बैलगाडीही जाऊ शकत नव्हती त्या ठिकाणी लोखंडी चाकांची गाडी करून रोहित्र नेण्यात आले.

Web Title: electricity in manvatvasti