katraj News : गुजरवाडी रस्ता परिसरात चार दिवस अंधार

ट्रान्सफार्मर जळाल्याने हा परिसर चार दिवसांपासून अंधारात
katraj News : गुजरवाडी रस्ता परिसरात चार दिवस अंधार
sakal

कात्रज : गुजरवाडी रस्ता, दत्तनगर, भारतनगर, निंबाळकर वस्ती भागात विद्युत ट्रान्सफर्मरमध्ये सातत्याने बिघाड होत असून नागरिकांना विजेच्या समस्यांना सामोरे जावे लागत आहे. ट्रान्सफार्मर जळाल्याने हा परिसर चार दिवसांपासून अंधारात आहे.

निंबाळकरवस्ती येथील विद्युत ट्रान्सफर्मारमधून दत्तनगर, भारतनगर, निंबाळकरवस्ती व गुजरवाडी रोड परिसरातील नागरिकांना वीज पुरवठा केला जातो. मात्र बुधवार रोजी सदर २०० केव्हीए ट्रान्सफर्मार ओव्हरलोडिंगमुळे ऑइल बाहेर फेकून जळाला.

याठिकाणी शुक्रवारी ट्रान्सफॉर्मर बदलून वीजपुरवठा सुरळित करण्यात आला मात्र, पुन्हा विजवाहिनी तुटल्याने शनिवारी वीजपुरवठा खंडित झाला. त्यामुळे नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागले.

या भागात नागरी वस्ती वाढली असून विद्युत ट्रान्सफर्मार वर लोड येऊन वारंवार विद्युत पुरवठा खंडित होतो. टाकीत पाणी चढविण्यासाठी लाईट नसल्याने गृहिणींना त्रास झाला. घरातील विद्युत उपकरणे बंद पडले. परिसरातील छोट्या उद्योजकांना काम बंद ठेवावे लागले. यातुन तीन दिवसात मोठे नुकसान झाले.

गुजरवाडी रस्ता, निंबाळकरवस्ती,दत्तनगर, भारतनगर भागात गेल्या तीन-चार दिवसांपासून लाईट नसल्याने नागरिक व व्यावसायिक यांचे नुकसान झाले.

महावितरण वीज बिल वसुलीबाबत जेवढी तत्परता दाखवते तेवढी तत्परता देखभाल दुरुस्तीत दाखवत नाहीत हे दुर्दैव आहे. - व्यंकोजी खोपडे, माजी सरपंच, गुजर-निंबाळकरवाडी

एक हजार ग्राहक क्षमतेचा भारतनगरचा ट्रान्सफर्मार २०० केव्हीए ओव्हरलोडिंगमुळे जळाला. त्या ठिकाणी ३१५केव्हीए नवीन ट्रान्सफर्मार बसविण्यात आला असून यापुढे या भागात ओव्हरलोडिंगमुळे बिघाड होणार नाही. आता वीज पुरवठा सुरळित करण्यात आला आहे. - संजय घोडके, कार्यकारी अभियंता, महावितरण, धनकवडी विभाग

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com