बाणेर, बालेवाडी, पाषाणमध्ये वीजपुरवठा खंडित 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 28 ऑगस्ट 2018

पुणे : महापारेषणची 132 केव्ही(किलोव्हॅट) क्षमतेची रहाटणी येथील वीजवाहिनी तुटल्यामुऴे बाणेर, बालेवाडी, पाषाणमध्ये वीजपुरवठा खंडित झाला आहे. मंगळवारी (ता.28) सकाळी सव्वा नऊच्या सुमारास 132 केव्ही एनसीएल उपकेद्रांचा वीजपुरवठा खंडित झाला. वीजग्राहंकानी सहकार्य करावे असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे.

या उपकेद्रांवरील वीजपुरवठ्यावर अवलंबून असलेल्या काही भागात पर्यायी व्यवस्थेतून वीजपुरवठा सुरु करण्यात आला आहे. पण भारव्यवस्थापन शक्य नसल्याने बाणेर, बालेवाडी, सुस  रस्ता, पाषाण, बावधन, औंधच्या  काही परिसरातील वीजरपुरवठा सध्या खंडीत आहे.  महापारेषणद्वारे वीजवाहिनीच्या दुरुस्तीचे काम युध्दपातळीवर सुरु असून आज दुपारी तीन वाजेपर्यंत ते पुर्ण होणार असल्याचे सांगितले जात आहे. त्यानंतर  बाणेर, बालेवाडी व इतर भागातील वीजपुरवठा पुर्ववत होईल असे महावितरणकडून सांगितले जात आहे.

Web Title: Electricity supply breaks in Baner, Balewadi and Stone

टॅग्स