Wed, October 4, 2023

Pune : कात्रज कोंढवा रस्ता परिसरात वीज पुरवठा खंडित
Published on : 19 May 2023, 5:57 pm
कात्रज : कात्रज कोंढवा रस्ता परिसरात मागील दोन तासांपासून वीज पुरवठा खंडित झाला आहे. अधिकाऱ्यांकडून वीज पुरवठा सुरळीत होण्यास ३ वाजतील असे सांगण्यात येत आहे. त्यामुळे भर उन्हाळ्यात वीज पुरवठा खंडित झाल्याने नागरिक उखाड्याने हैराण झाले असून त्यांच्याकडून संताप व्यक्त करण्यात येत आहे.
परिसरात सातत्याने वीज पुरवठा खंडित होत असून याकडे महावितरणचे अधिकारी दुर्लक्ष करतात. त्यामुळे पुन्हा तोच प्रश्न उपस्थित होतो. याला सर्वस्वी जबाबदार हे महावितरणचे अधिकारी असल्याचे स्थानिक नागरिक अरविंद मोरे यांनी म्हटले.