खंडित वीजपुरवठ्यामुळे मोशीकर झाले त्रस्त

Electricity
Electricity

पिंपरी - मोशी परिसरात महावितरण कंपनीच्या वतीने होणाऱ्या खंडित वीजपुरवठ्यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. त्यामुळे महावितरण कंपनीने हा वीजपुरवठा तातडीने सुरळीत करावा, अशी नागरिकांची मागणी आहे. 

गेल्या चार ते पाच महिन्यांपासून खंडित वीजपुरवठा होत आहे. मोशी परिसरातील मोठ्या इमारतींना लिफ्ट आहेत. वीजपुरवठा खंडित होत असल्याने सोसायट्यांना त्यांच्या पाण्याच्या खालच्या टाक्‍यातून इमारतीवरच्या टाक्‍यांमध्ये पाणी चढविणे अवघड होत आहे. सोसायट्यांच्या परिसरात लहान मुले खेळत असतात. मात्र, खंडित वीजपुरवठ्यामुळे लिफ्टही वरचेवर बंद पडतात. त्यामुळे नागरिकांचीही गैरसोय होत आहे. मुले खेळायला ये-जा करण्यासाठी लिफ्टचाच वापर करतात. मुले लिफ्टमध्ये अडकून अपघाताचाही धोका संभवतो. त्यामुळे महावितरण कंपनीने या प्रश्‍नाचे गांभीर्य ओळखून तातडीने उपाययोजना करण्याची नागरिकांची मागणी आहे. 

यासंदर्भात, ऑस्टिया डेस्टिनेशन या सोसायटीमधील नागरिक डॉ. किशोर सस्ते म्हणाले, ‘‘वरचेवर वीजपुरवठा खंडित होत आहे. त्यामुळे लिफ्टमधून येणारे-जाणारे नागरिक भीतभीतच त्याचा वापर करीत आहेत. काही वेळेस कमी दाबाने वीजपुरवठा होतो. त्या वेळी लिफ्टमधून ये-जा करणाऱ्या नागरिकांना अपघाताचा धोका संभवतो.’

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com