‘इलेक्‍ट्रॉनिक्‍स इन ॲक्‍शन’ कार्यशाळा

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 21 जून 2019

कार्यशाळेविषयी...
कधी - रविवार, २३ जून २०१९ 
केव्हा - सायंकाळी ४ ते ६.३० 
कुठे - सकाळ कार्यालय, बुधवार पेठ, पुणे
प्रवेश - शुल्क ५०० रुपये
संपर्क - ९५५२५३३७१३, ८८०५००९३९५

पुणे - सध्याचे युग तंत्रज्ञानाचे आहे. शालेय वयातच तंत्रशिक्षण मिळणे फायद्याचे आहे. फक्त पुस्तक वाचून आणि व्हिडिओ पाहून या विषयास समजून घेणे अशक्‍य आहे. इलेक्‍ट्रॉनिक्‍सचा अभ्यास करण्यासाठी त्याला प्रयोगांची सांगड हवी असते; म्हणूनच ‘यंग बझ’ आणि ‘बॉक्‍स ऑफ सायन्स’तर्फे विद्यार्थ्यांसाठी ‘इलेक्‍ट्रॉनिक्‍स इन ॲक्‍शन’ ही एकदिवसीय कार्यशाळा आयोजिली आहे.

इलेक्‍ट्रॉनिक्‍स हा विषय तसा किचकट आणि अवघड समजला जातो. शालेय अभ्यासक्रमातही इलेक्‍ट्रॉनिक्‍सचा समावेश असल्याने हा विषय महत्त्वाचा आहे. यात विद्यार्थ्यांना इलेक्‍ट्रॉनिक्‍स विषयाची ओळख, सर्किटमधील कंपोनंट्‌सची माहिती, त्यामागील विज्ञान समजून घेता येईल. तसेच, सहभागींना पाच इलेक्‍ट्रॉनिक्‍सच्या किट्‌स मिळतील. यात सर्किट कसे बनवितात, टच सेन्सर, रेन सेन्सर, कपॅसिटर वापरून ब्लिंकिंग एलईडी बनविणे, ऑटोमॅटिक डार्क सेन्सर आदी गोष्टी मुलांना बनवायला शिकविल्या जातील. हे सर्व सर्किट्‌स मुलांना घरी घेऊन जाता येतील.

पुस्तकातून काही गोष्टी समजावून घेताना त्याला कृतीची जोड मिळाली, तर त्या संकल्पना जास्त काळ लक्षात राहतात. सोबतच मुलांमधील जिज्ञासा आणि कौशल्यांचाही विकास होतो. लहान वयात मुलांमधील ऊर्जेला व विचारशक्तीला चालना देण्यासाठी ही कार्यशाळा फायद्याची ठरेल.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Electronic in action workshop young buzz