इलेक्‍ट्रॉनिक्‍स ॲडव्हान्सचे विद्यार्थ्यांना मिळणार धडे

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 17 सप्टेंबर 2019

कार्यशाळेविषयी...
कधी - रविवार, ता. २२ सप्टेंबर २०१९ 
कुठे - पाठशाला स्कूल, रहाटणी - (सकाळी १० ते १२.३०) - 
       सकाळ कार्यालय, बुधवार पेठ - (सायंकाळी ४ ते ६.३०)  
वयोगट - इयत्ता चौथीपासून पुढे
फी - ६००/- (ऑनलाइन रजिस्ट्रेशन उपलब्ध) 
संपर्क - ९५५२५३३७१३, ८८०५००९३९५

पुणे - विद्यार्थिदशेतच तंत्रशिक्षण मिळणे फायद्याचे आहे. फक्त पुस्तक वाचून आणि व्हिडिओ पाहून या विषयास समजून घेणे अशक्‍यप्राय आहे.

इलेक्‍ट्रॉनिक्‍सचा अभ्यास करण्यासाठी त्याला प्रयोगांची सांगड हवी. म्हणूनच, ‘यंग बझ’ आणि ‘बॉक्‍स ऑफ सायन्स’ने विद्यार्थ्यांसाठी ‘इलेक्‍ट्रॉनिक्‍स इन ॲक्‍शन’ ही एकदिवसीय कार्यशाळा आयोजिली होती. त्याला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या वेळी इलेक्‍ट्रॉनिक्‍समधील ‘ॲडव्हान्स कार्यशाळा’ २२ सप्टेंबरला ‘सकाळ’चे बुधवार पेठ कार्यालय व रहाटणी येथील पाठशाला स्कूलमध्ये होणार आहे.

इलेक्‍ट्रॉनिक्‍स हा विषय किचकट आणि अवघड समजला जातो. अगदी पदवी शिक्षणातही हा विषय बहुतांश विद्यार्थ्यांना जिकिरीचा ठरतो. शालेय अभ्यासक्रमातही इलेक्‍ट्रॉनिक्‍सचा समावेश असल्याने हा विषय महत्त्वाचा बनतो. 

मागील कार्यशाळेत विद्यार्थ्यांना इलेक्‍ट्रॉनिक्‍स विषयाची ओळख, सर्किटमधील कंपोनंट्‌सची माहिती, त्यामागील विज्ञानाची माहिती घेतली. यात सर्किट कसे बनवितात, पॅरलल सर्किट, डार्क सेन्सर, स्विच अँड कन्ट्रोल्ड सर्किट, वॉटर लेव्हल इंडिकेटर सर्किट आदी गोष्टी स्वतः मुलांना बनवायला शिकविले जाईल. हे सर्व सर्किट्‌स मुलांना घरी घेऊन जाता येतील. त्याच्या नोट्‌सही देणार असून, सहभागाचे प्रमाणपत्र प्रत्येक सहभागीला मिळणार आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Electronics in action workshop Student Learning