अकरा वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार ; सीसीटीव्हीमुळे आरोपी अटकेत

संतोष शेंडकर
रविवार, 27 मे 2018

सोमेश्वरनगर : येथे एका त्रेचाळीसवर्षीय नराधमाने अकरा वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याची घटना काल रात्री घडली. याप्रकरणी आज सहा-सात तासातच पोलिसांनी त्याला अटक करण्यात यश मिळविले. याप्रकरणी वडगाव निंबाळकर पोलिस ठाण्यात बालकांचा लैंगिक अत्याचार विरोधी कायदा व अॅट्रॅासिटीअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली असल्याची माहिती पोलिस उपअधिक्षक बापू बांगर यांनी दिली. 

काल सायंकाळी साडेसहाच्या सुमारास पिडीत मुलगी कानातील वस्तू घेण्यासाठी दुकानात गेली होती. दुकानातून बाहेर पडल्यावर एका अनोळखी इसमाने तिला जबरदस्तीने दुचाकीवर बसवून कालव्याच्या रस्त्याने जवळच्या शेतामध्ये नेले. दोन ठिकाणी पिडीत मुलीवर त्याने लैंगिक अत्याचार केले. रात्री अकराच्या सुमारास त्याने परत मुलीला रस्त्यावर आणून सोडले आणि दुचाकीवरून तो पसार झाला. याबाबत पिडीत मुलीच्या आईने दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात इसमाविरूध्द गुन्हा नोंद करण्यात आला होता. 

दरम्यान, सदर घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पुणे जिल्हा ग्रामीण पोलिस अधिक्षक सुवेझ हक व अप्पर पोलिस अधिक्षक संदीप पखाले यांच्या मार्गदर्शनाखाली बांगर यांच्या नेतृत्वाखाली पथकाने हालचाली केल्या. सीसीटीव्ही फुटेज आणि करंजेपूल पोलिस दूरक्षेत्रातील सचिन वाघ व विठ्ठल कदम या कर्मचाऱ्यांची गोपनिय माहिती या आधारे वडगाव निंबाळकर पोलिस ठाण्याचे अधिकारी-कर्मचारी, बारामती गुन्हे शोध पथक व पुणे स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग यांच्या संयुक्त कारवाईत आरोपीस सहा ते सात तासात जेरबंद केले. सदर आरोपीने गुन्ह्याची कबुलीही दिली आहे. तोही परिसरातीलच आहे, अशी माहिती बांगर यांनी दिली. आरोपीवर अनूसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा, बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा या अनुषंगाने गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यापूर्वीही आरोपीवर गुन्हे दाखल होते. अधिक तपास बांगर यांच्याकडेच आहे. कायदेशीर सोपस्कर बाकी असल्याने आरोपीचे नाव सांगण्यास पोलिसांनी नकार दिला.

  •  सीसीटीव्ही बसवा

कर्मचाऱ्यांकडे गोपनिय माहिती होती. परंतु सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपीचा शोध घेणे सुकर झाले. त्यामुळे सीसीटीव्हीचे महत्व अधोरेखित झाले आहे. त्यामुळे सर्व संस्था, नागरिक यांनी सीसीटीव्ही लावून घ्यावेत, असे आवाहन बापू बांगर व वडगाव निंबाळकर पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक सचिन पाटील यांनी केले आहे.

Web Title: Eleven years old sexual abuse on a minor girl