अकरावी बायफोकलची गुणवत्ता यादी गुरुवारी

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 19 जून 2018

पुणे - अकरावी प्रवेश प्रक्रियेत द्विलक्ष्यी अभ्यासक्रमाचे (बायफोकल) प्रवेश शून्य फेरीत होणार आहेत. या अभ्यासक्रमासाठी चार हजार 861 विद्यार्थ्यांनी अर्ज भरले आहेत. त्यांची गुणवत्ता यादी 21 जून रोजी प्रसिद्ध होणार आहे. त्यानुसार विद्यार्थ्यांनी 21 आणि 22 जून रोजी मिळालेल्या महाविद्यालयात प्रवेश घ्यायचे आहेत.

संस्थाअंतर्गत (इनहाऊस), व्यवस्थापन आणि अल्पसंख्याक कोट्यातील प्रवेशही शून्य फेरीतच होणार आहेत. त्यासाठी विद्यार्थ्यांनी अर्ज भरून ते संबंधित कनिष्ठ महाविद्यालयात सादर करायचे आहेत. या अर्जाचा नमुना केंद्रीय प्रवेश प्रक्रिया समितीच्या म्हणजे प्रवेशविषयक संकेतस्थळावर उपलब्ध आहे. शाळांमध्येही तो उपलब्ध होईल.

समितीने जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार कनिष्ठ महाविद्यालयांनी गुणवत्ता यादी जाहीर करायची आहे. त्यानुसार प्रवेश देऊन ते समितीच्या संकेतस्थळावर अपलोड करायचे आहेत. त्यासाठी लिंक खुली करण्याची तारीख आणि अन्य तपशील उद्या (ता. 19) जाहीर केला जाणार आहे, असे सहायक शिक्षण संचालक मीनाक्षी राऊत यांनी "सकाळ'ला सांगितले.

Web Title: eleventh bifocal list on thursday