अकरावी प्रवेशाची "प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य' फेरी 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 21 ऑगस्ट 2018

पुणे - अकरावी प्रवेशाच्या प्रतीक्षेत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी "प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य' (एफसीएफएस) पहिली फेरी जाहीर झाली आहे. येत्या शनिवारपासून (ता. 25) ही फेरी सुरू होणार असून प्रथम, द्वितीय आणि तृतीय अशा तीन टप्प्यांत विद्यार्थ्यांना प्रवेश दिले जाणार आहेत. या फेरीनंतरही विद्यार्थ्यांना "एफसीएफएस'च्या दुसऱ्या फेरीत संधी मिळणार आहे. 

पुणे - अकरावी प्रवेशाच्या प्रतीक्षेत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी "प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य' (एफसीएफएस) पहिली फेरी जाहीर झाली आहे. येत्या शनिवारपासून (ता. 25) ही फेरी सुरू होणार असून प्रथम, द्वितीय आणि तृतीय अशा तीन टप्प्यांत विद्यार्थ्यांना प्रवेश दिले जाणार आहेत. या फेरीनंतरही विद्यार्थ्यांना "एफसीएफएस'च्या दुसऱ्या फेरीत संधी मिळणार आहे. 

अकरावी प्रवेशाच्या चार नियमित फेऱ्यांनंतरही प्रवेशापासून वंचित राहिलेल्या विद्यार्थ्यांसाठी विशेष फेरी घेण्यात आली. या फेरीनंतरही अद्याप प्रवेश न मिळालेल्या आणि प्रवेशाच्या प्रतीक्षेत असणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य (फस्ट कम फस्ट सर्वे- एफसीएफएस) फेरीत संधी मिळणार आहे. या फेरीतील प्रवेश श्रेणीनुसार टप्प्याटप्प्याने होणार आहेत. "प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य'च्या दुसऱ्या फेरीतील रिक्त जागांचा तपशील 2 सप्टेंबरला जाहीर होईल, अशी माहिती प्रभारी शिक्षण उपसंचालक मीनाक्षी राऊत यांनी दिली आहे. 

* या विद्यार्थ्यांना मिळणार संधी : 
- कोणत्याही महाविद्यालयात अद्याप प्रवेश न घेतलेले 
- प्रथम पसंतीक्रमाचे महाविद्यालय मिळूनही प्रवेश न घेणारे 
- आतापर्यंत झालेल्या प्रवेश फेऱ्यांमध्ये अद्याप कोणतेही महाविद्यालय न मिळालेले 
- विशेष फेरीतही प्रवेश नाकारलेले 

* अशी असेल श्रेणी 
प्रथम श्रेणी : 80 टक्के आणि त्यापेक्षा जास्त 
द्वितीय श्रेणी : 60 टक्के आणि त्यापेक्षा जास्त 
तृतीय श्रेणी : 35 टक्के आणि त्यापेक्षा जास्त 

* "प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य' फेरीचे सविस्तर वेळापत्रक : 
तपशील : कालावधी : वेळ 
* प्रथम श्रेणी 
- प्रथम श्रेणीतील विद्यार्थ्यांसाठी रिक्त जागांचा तपशील उपलब्ध : 25 ऑगस्ट : सकाळी 11 वाजता 
- प्रवेशासाठी ऑनलाइन अर्जात मिळेल संधी : 27 ऑगस्ट : सकाळी 10 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत 
- प्रवेशाची मुदत : 27 आणि 28 ऑगस्ट : सकाळी 10 ते दुपारी 3 वाजेपर्यंत 

* द्वितीय श्रेणी 
- रिक्त जागांचा तपशील उपलब्ध : 28 ऑगस्ट : सायंकाळी 6 वाजता 
- प्रवेशासाठी ऑनलाइन अर्जात मिळेल संधी : 29 ऑगस्ट : सकाळी 10 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत 
- प्रवेशाची मुदत : 29 आणि 30 ऑगस्ट : सकाळी 10 ते दुपारी 3 वाजेपर्यंत 

* तृतीय श्रेणी 
- रिक्त जागांचा तपशील उपलब्ध : 30 ऑगस्ट : सायंकाळी 6 वाजता 
- प्रवेशासाठी ऑनलाइन अर्जात मिळेल संधी : 31 ऑगस्ट : सकाळी 10 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत 
- प्रवेशाची मुदत : 31 ऑगस्ट आणि 1 सप्टेंबर : सकाळी 10 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत 

Web Title: Eleventh entrance to first-come first priority round