esakal | पुणे : अकरावीच्या वीस हजारांहून अधिक जागा राहणार रिक्त
sakal

बोलून बातमी शोधा

Admission

पुणे : अकरावीच्या वीस हजारांहून अधिक जागा राहणार रिक्त

sakal_logo
By
- मीनाक्षी गुरव

पुणे - यंदा अकरावीच्या प्रवेशासाठी (Eleventh Admission) यंदा पुणे (Pune) आणि पिंपरी-चिंचवड शहरातील (Pimpri Chinchwad City) ३१६ कनिष्ठ महाविद्यालयातील एक लाख १२ हजार ९६५ जागा प्रवेशासाठी (Admission) उपलब्ध आहेत. या जागांवरील प्रवेशासाठी केवळ ८५ हजार ५१८ विद्यार्थ्यांनी (Student) ऑनलाइन नोंदणी केली असून त्यातील केवळ ७७ हजार ९८६ विद्यार्थ्यांनी अर्ज लॉक केले आहेत. त्यामुळे यंदाही प्रवेशाच्या जवळपास वीस हजारांहून अधिक जागा रिक्त राहण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिका कार्यक्षेत्रातील कनिष्ठ महाविद्यालयातील अकरावी प्रवेशासाठी ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया राबविली जात आहे. सध्या या प्रवेश प्रक्रियेतील तिसरी फेरी सुरू आहे. यंदाही प्रवेशासाठी उपलब्ध असलेल्या जागांपेक्षा प्रत्यक्ष प्रवेशासाठी नोंदणी करणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या तुलनेने कमी आहे. प्रवेशासाठी ऑनलाइन नोंदणी करणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या कमी असल्याने जवळपास २७ हजारांपेक्षा जास्त जागा यंदा रिक्त राहणार असल्याचे चित्र आहे. परंतु तरीही नामांकित महाविद्यालयातील प्रवेशासाठी विद्यार्थ्यांमध्ये मोठी स्पर्धा पाहायला मिळत आहे.

हेही वाचा: अकरावी तिसरी गुणवत्ता यादी; अजूनही 50 टक्के विद्यार्थ्यांचे प्रवेश होणे बाकी

तिसऱ्या फेरीतील प्रवेश यादीची प्रतीक्षा संपणार

प्रवेश प्रक्रियेतील तिसऱ्या नियमित फेरीच्या प्रवेशाची यादी सोमवारी (ता.१३) जाहीर होत आहे. यंदा इयत्ता दहावीचा विक्रमी निकाल लागल्याने अकरावी प्रवेशाचा ‘कट-ऑफ’ वाढणार असल्याची शक्यता व्यक्त केली जात होती. परंतु दहावीच्या निकाल वाढीचा ‘कट-ऑफ’मध्ये फारसा फरक पडला नसल्याचे दिसून आले. अकरावी प्रवेशाची तिसरी फेरीतील निवड यादी सोमवारी जाहीर होत आहे. दरम्यान पहिल्या, दुसऱ्या फेरीत प्रवेश मिळू न शकलेल्या आणि पसंतीचे महाविद्यालय न मिळालेल्या विद्यार्थ्यांचे लक्ष प्रवेशाच्या तिसऱ्या फेरीतील प्रवेश यादीकडे लागले आहे.

अकरावी प्रवेशाची आतापर्यंतची आकडेवारी -

- एकूण कनिष्ठ महाविद्यालये : ३१६

- प्रवेशाच्या उपलब्ध जागा : १, १२,९६५

- प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांची संख्या (आतापर्यंत) : ३८,९७५

- रिक्त जागा : ७३,९९०

प्रवेशासाठी नोंदणी झालेले विद्यार्थी -

- ऑनलाइन नोंदणी केलेले विद्यार्थी : ८५,५१८

- अर्ज लॉक केलेले विद्यार्थी : ७७,९८६

- व्हेरीफाय अर्ज : ७७,७०६

- पर्याय भरलेले विद्यार्थी : ७१,६८२

loading image
go to top