बारामतीकर "या झाडांच्या' फुलाच्या वासाने हैराण

मिलिंद संगई ः सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 14 नोव्हेंबर 2019

शहरातील सप्तपर्णीच्या झाडांच्या फुलोऱ्याच्या वासाने नागरिक हैराण झाले आहेत. ही झाडे काढून त्या जागी इतर झाडांचे पुनर्रोपण करावे, अशी मागणी कारभारी अण्णा चॅरिटेबल फाउंडेशनच्या वतीने गुरुवारी करण्यात आली.

सप्तपर्णीच्या जागी इतर झाडांचे रोपण करण्याची मागणी

बारामती शहर (पुणे) ः शहरातील सप्तपर्णीच्या झाडांच्या फुलोऱ्याच्या वासाने नागरिक हैराण झाले आहेत. ही झाडे काढून त्या जागी इतर झाडांचे पुनर्रोपण करावे, अशी मागणी कारभारी अण्णा चॅरिटेबल फाउंडेशनच्या वतीने गुरुवारी करण्यात आली. संस्थेचे सचिव प्रशांत नाना सातव यांनी मुख्याधिकारी योगेश कडुसकर यांच्याकडे निवेदनाद्वारे ही मागणी करण्यात आली.

शहरात भिगवण रस्त्यासह अनेक ठिकाणी सप्तपर्णीची झाडे लावण्यात आली आहेत. या झाडाच्या फुलांमुळे अनेक नागरिकांना अस्थमा, खोकला, सर्दी, उच्च रक्तदाब असे विकार होत आहेत. या शिवाय पर्यावरण संतुलन बिघडण्याचा धोका आहे. राज्य सरकारच्या सामाजिक वनीकरण विभागाच्या मार्गदर्शक वृक्षलागवड प्रणालीतही सप्तपर्णीचे झाड नाही. त्यामुळे आगामी काळात वृक्षारोपण करताना नगरपालिकेने सामाजिक वनीकरण विभागाच्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करावे, अशी मागणी या निवेदनात करण्यात आली आहे.

बारामतीतील ही झाडे काढून टाकली नाहीत तर आंदोलन करू, असा इशारा या वेळी देण्यात आला. या प्रसंगी प्रशांत नाना सातव यांच्यासमवेत अजित साळुंके, दिलीप लांडे, झहीर पठाण, भाऊ मोरे, प्रकाश मोरे, आबा चांदगुडे, माऊली पानवकर, विक्रम ननवरे आदी उपस्थित होते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Embarrassed by the smell of flowers of the Baramatikar Saptaparni tree