Pune Rains : पुणेकरांनो, घाबरू नका; प्रशासनाकडून आपातकालीन क्रमांक जारी

Pune Rains : पुणेकरांनो, घाबरू नका; प्रशासनाकडून आपातकालीन क्रमांक जारी

पुणे : पुण्यात काल (बुधवार) झालेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले. पावसाने हाहाकार उडवला असून, नागरिकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. तसेच ओढ्या नाल्यांना पूर आले असून, अनेक घरात पाणी शिरले आहे. या सर्व परिस्थितीनंतर प्रशासनाकडून आपातकालीन क्रमांक जारी करण्यात आले आहेत. 

पुणे शहर आणि उपनगरांत पुढील चोवीस तासांत तीव्र पावसाची शक्‍यता हवामान खात्याने वर्तविली असून, या काळात महापालिकेची आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा सज्ज ठेवण्यात आल्याचे महापालिकेने कळविले आहे. पावसामुळे पूरस्थिती किंवा अन्य अनुचित घटना घडल्यास नागरिकांनी संपर्क करावा, असे आवाहन महापालिकेने केले आहे. त्यासाठी दूरध्वनी क्रमांक उपलब्ध करून देण्यात आले आहेत. 

महापालिका (आपत्ती व्यवस्थापन व मदत सेवा) 
(020)-25506800/1/2/3/4/, 020-25501269 

अग्निशमन दल 
020-26451707, 26450601/101 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com