डोळ्यांतील अश्रू पुसण्यासाठी सरसावले कर्मचारी 

help.jpeg
help.jpeg


पुणे : खडकीतील महादेववाडी येथील सुमारे सत्तर ते ऐंशी घरे पुराच्या तडाख्यात सापडली होती. त्यात अनेकांचे संसार पाण्यात गेले होते. त्यांचे संसार पुन्हा उभे करणे, त्यांच्या डोळ्यांतील अश्रू पुसणे ही आपणा सर्वांची जबाबदारी असल्याचे ओळखून येथील स्वयंभू ट्रान्सपोर्टमधील कर्मचाऱ्यांनी खडकीतील पूरबाधितांसाठी आपला एक दिवसाचा पगार जमा करून सुमारे दोन लाखांची मदत दिली. 

ज्या समाजात आपण राहतो, त्या समाजाचे उत्तरदायित्व आपणावर असते. त्या ऋणातून उतराई होण्यासाठी खारीचा वाटा म्हणून ही रक्कम देण्यात आल्याचे कर्मचाऱ्यांनी या वेळी सांगितले. स्वयंभू ट्रान्सपोर्टमधील एकूण सहाशे कर्मचाऱ्यांचा एक दिवसाच्या पगारापोटी जमा झालेला दोन लाख दहा हजार रुपयांचा हा धनादेश ट्रान्स्पोर्टचे मालक नामदेव भापकर यांनी खडकी कॅंटोन्मेंट बोर्डाचे अध्यक्ष ब्रिगेडियर एम. जे. कुमार यांच्याकडे सुपूर्त केला. 

या प्रसंगी खडकी कॅंटोन्मेंट बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोद कुमार सिंग, बोर्डाचे उपाध्यक्ष दुर्योधन भापकर, नगरसेवक मनीष आनंद, कमलेश चासकर, अभय सावंत, नगरसेविका पूजा आनंद आदी उपस्थित होते. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com