बिबवेवाडीतील रुग्णालय जिल्हा परिषदेकडून अधिग्रहित 

बिबवेवाडीतील रुग्णालय जिल्हा परिषदेकडून अधिग्रहित 

पुणे - बिबवेवाडी येथील "कर्मचारी राज्य बीमा निगम' (इएसआयसी) रुग्णालयाचे समर्पित कोविड आरोग्य केंद्रामध्ये रुपांतर करण्यात येणार आहे. त्यासाठी हे रुग्णालय सर्व मनुष्यबळ आणि सुविधांसह अधिग्रहित करून जिल्हा परिषदेकडे वर्ग करण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी दिले आहेत. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

बिबवेवाडी येथील या रुग्णालयात कोविड केअर सेंटर (सीसीसी) सुरू करण्यात आले आहे. परंतु कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर या रुग्णालयाचे समर्पित कोविड आरोग्य केंद्र (डीसीएचसी) मध्ये रुपांतर करण्यात येणार आहे. हे रुग्णालय सर्व मनुष्यबळ व सुविधांसह कोरोना कालावधीपुरते जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे वर्ग करण्यात आले आहे. बाह्य रुग्ण विभाग तात्पुरत्या स्वरुपात जिल्हा परिषदेच्या नियंत्रणाखाली देण्यात येत आहे. 

जगभरातील बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक संभाजी लांगोरे यांची प्रशासक म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. या रुग्णालयातील उपलब्ध 50 बेड्‌सपैकी 36 बेडस्‌साठी ऑक्‍सिजन पाईपलाईन उपलब्ध आहे. 

देशभरातील बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com