रोजगार उपलब्ध करून द्या!

Election
Election

पुणे - देशामध्ये तरुणांची संख्या सर्वाधिक असली तरी, त्या प्रमाणात रोजगार उपलब्ध होत नाही. त्यामुळे बेरोजगारीचे प्रमाण वाढले आहे. याकडे सर्व राजकीय पक्षांनी गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे. तरुणांना रोजगार उपलब्ध करून दिले पाहिजेत. खासदार तरुण आणि उच्चशिक्षित असला पाहिजे, अशी अपेक्षा नवमतदारांची आहे.

योगेश हेगडकर - सध्या तरुणांना उच्च शिक्षण घेऊनदेखील नोकरी मिळत नाही. त्यामुळे शिक्षणपद्धतीत बदल करणे गरजेचे आहे. या बदलासाठी खासदाराने प्रयत्नशील असावे. 

मीनल भोसले - तरुण मतदारांची संख्या सर्वाधिक असली तरी, तरुणांचे प्रश्‍न आजही अनुरुत्तरीत आहेत. हे प्रश्‍न गंभीर होत असून, ते लवकर सोडविण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. त्याचबरोबर शहराच्या विकासाचा साचेबंद आराखडा उमेदवाराकडे असायला हवा. उमेदवार उच्चशिक्षित आणि तरुण असावा. 

विनायक कोकाटे - खासदार तरुण असला पाहिजे. शिक्षण आणि बेरोजगारीवर गांभीर्याने विचार करणारा असायला हवा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com