पुण्यात रोजगार मेळावा 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 17 जुलै 2018

'हॉस्पीटॅलीटी व टुरिझम सेक्टर मधील विविध पदांसाठी चांगल्या वेतनाचे रोजगार प्राप्त करून दिले जाणार आहेत. आवश्यकतेनुसार प्रशिक्षणाची सोय उपलब्ध होणार आहे. 

मंचर : टुरिझम अॅण्ड हॉस्पिटॅलीटी स्कील कौन्सिल यांच्यामार्फत महाराष्ट्र कॉस्मोपॉलिटियन एज्युकेशन सोसायटी आझम कॅम्पस कॅम्प गोळीबार मैदानाजवळ पुणे येथे गुरुवारी ता. 26 ला सकाळी नऊ ते संध्याकाळी चार या वेळेत रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आलेले आहे. अशी माहिती जिल्हा कौशल्य रोजगार व उद्योजगता मार्गदर्शन केंद्राच्या सहाय्यक संचालिका अनुपमा पवार यांनी दिली. 
 
त्या म्हणाल्या, 'हॉस्पीटॅलीटी व टुरिझम सेक्टर मधील विविध पदांसाठी चांगल्या वेतनाचे रोजगार प्राप्त करून दिले जाणार आहेत. आवश्यकतेनुसार प्रशिक्षणाची सोय उपलब्ध होणार आहे. मेळाव्याच्या ठिकाणीच हॉटेल, रेस्टॉरंट, रस्ते, जल, हवाई वाहतूक व पर्यटन या क्षेत्रांमध्ये नोकऱ्या उपलब्ध होणार आहेत. इयत्ता पहिली ते नववी पास किंवा नापास, दहावी पास नापास, पदवीधर पास नापास, शिक्षण घेतलेल्या व आयटीआय मधून प्लंबर, इलेक्ट्रिशियन एअर कंडीशनिग व रेफ्रिजरेशन रिपेअरिंग व मेंटेनन्सचे कोर्स केलेल्या व नोकरीच्या शोधात असलेल्या १८ ये ३० वयोगटातील अकुशल, कुशल सक्षम दिव्यांग युवक युवतींना नोकरी मिळण्याची संधी उपलब्ध आहे.' 

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.

Web Title: Employment Rally in Pune