पाहा मनमोहक पुष्परचना

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 28 जानेवारी 2017

पुणे - रंगीबेरंगी फुलांचा वापर करून केलेली मनमोहक रचना, फळे-भाजीपाला यांच्या वापरातून साकारलेल्या कलाकृती त्याचबरोबर बोन्साय, शोभेच्या झाडांच्या वैशिष्ट्यपूर्ण रचनेतून साकारलेली उद्यानाची प्रतिकृती पाहण्याची संधी पुष्पप्रदर्शनाच्या निमित्ताने पुणेकरांना मिळत आहे.

एम्प्रेस बोटॅनिकल गार्डन येथे आयोजित या प्रदर्शनाचे उद्‌घाटन गुरुवारी (ता. 26) पुणे कॅंटोन्मेंट बोर्डाचे अध्यक्ष ब्रिगेडिअर ए. के. त्यागी यांच्या हस्ते झाले. मोना पिंगळे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी जास्वंद, गुलाब, विविध शोभेच्या फुलांचा वापर करून साकारलेली जपानी पद्धतीची पुष्परचना हे येथील आकर्षण आहे. याशिवाय विविध प्रकारची गुलाबपुष्पेही लक्ष वेधून घेत आहेत. हे प्रदर्शन रविवारपर्यंत रसिकांसाठी खुले असणार आहे.

प्रदर्शनानिमित्त आयोजित पुष्परचना स्पर्धेच्या विजेत्यांना शुक्रवारी "सकाळ माध्यम समूहा'चे अध्यक्ष प्रतापराव पवार यांच्या हस्ते सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. पवार म्हणाले, ""गार्डनमध्ये होणाऱ्या पुष्पप्रदर्शनाला रसिकांचा नेहमीच भरभरून प्रतिसाद मिळतो. उद्यानामध्ये सतत नावीन्य असले पाहिजे, असाच प्रशासनाचा प्रयत्न असतो. याच प्रयत्नातून आगामी काळात येथे अनेक नवीन गोष्टी पाहायला मिळतील. त्याचे काम परवानगीच्या टप्प्यात असून, लवकरच प्रत्यक्ष कामाला सुरवात होईल.''

Web Title: Empress Garden in flower show