उत्कृष्ठ खेळाडू तयार करण्यासाठी खेळाडूंना प्रोत्साहन द्या: हर्षवर्धन पाटील

राजकुमार थोरात
गुरुवार, 26 एप्रिल 2018

वालचंदनगर (पुणे): उत्कृष्ठ खेळाडू तयार करण्यासाठी समाजातील नागरिकांनी मुला-मुलींना प्रोत्साहन देण्याची गरज असल्याचे मत माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांनी व्यक्त केले.

वालचंदनगर (पुणे): उत्कृष्ठ खेळाडू तयार करण्यासाठी समाजातील नागरिकांनी मुला-मुलींना प्रोत्साहन देण्याची गरज असल्याचे मत माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांनी व्यक्त केले.

शेळगाव (ता. इंदापूर) येथे शांताई विकास प्रतिष्ठान व जे.के.क्रीडा मंच यांच्या वतीने महात्मा फुले व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त आयोजित केलेल्या मैदानी शिबिराच्या समारोपाच्या कार्यक्रमामध्ये बोलत होते. यावेळी निरा भिमा कारखान्याचे अध्यक्ष लालासाहेब पवार अॅड. कृष्णाजी यादव, कर्मयोगीचे संचालक आबासाहेब शिंगाडे, राहुल जाधव, सुभाष काळे, दिनकर नलवडे, मोहन दुधाळ,  विठ्ठल जाधव,भागवत भुजबळ उपस्थित होते. यावेळी पाटील यांनी सांगितले की, ग्रामीण भागातील खेळाडूमध्ये जिद्द व चिकाटी असते. विजयासाठी त्यांना प्रोत्साहन देण्याची गरज आहे. मुलांमध्ये अनेक सुप्त गुण असतात. ते ओळखून पालक व नागरिकांनी त्यांना प्रोत्साहन द्यावे. शेळगाव मधील मुला-मुलींनी राष्ट्रीय पातळीवरील स्पर्धेमध्ये  सुवर्णपदके मिळवून गावाचे नाव उंचावले आहे. हे इंदापूर तालुक्यासाठी ही कौतुकास्पद असल्याचे पाटील यांनी सांगितले.

यावेळी पाटील यांच्या हस्ते विविध क्षेत्रामध्ये उल्लेखनीय काम केलेल्या नागरिकांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमापूर्वी अर्बन बॅंकेचे संचालक वसंत पवार यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक जे के क्रिडा मंचाचे कैलास जाधव तर सूत्रसंचालन परशुराम मोहिते यांनी केले. आभार अनिल जाधव यांनी मानले.

Web Title: Encourage the players Harshwardhan Patil