पुणे : घोरपडीत रेल्वेच्या जागेवर अतिक्रमण कारवाई

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 22 डिसेंबर 2018

घोरपडी : शक्ती नगर येथील रेल्वे शेजारील घरावर प्रशासनाच्या वतीने मोठ्या प्रमाणात कारवाई करण्यात आली. यावेळी साधारण पंचवीस वर्ष जुनी चाळीस घरे तोडून टाकली. या कारवाईचा निषेध करण्यासाठी नागरिकांनी एका तासापेक्षा जास्त वेळ भारत फोर्स कंपनीकडे जाणारा रस्ता बंद केला होता.

घोरपडी : शक्ती नगर येथील रेल्वे शेजारील घरावर प्रशासनाच्या वतीने मोठ्या प्रमाणात कारवाई करण्यात आली. यावेळी साधारण पंचवीस वर्ष जुनी चाळीस घरे तोडून टाकली. या कारवाईचा निषेध करण्यासाठी नागरिकांनी एका तासापेक्षा जास्त वेळ भारत फोर्स कंपनीकडे जाणारा रस्ता बंद केला होता.

रेल्वे प्रशासनाची कारवाई पूर्ण झाल्यानंतर नागरिकांनी या घटनेचा निषेध म्हणून नागरिकांनी भारत फोर्स कंपनी कडे जाणाऱ्या रस्त्यावर घरातील तुटलेले सामान आणि दगड धोंडे टाकून रस्ता बंद केला. तसेच मोठ्या प्रमाणावर नागरिकांनी रस्त्यामध्ये उभे राहून ठिय्या आंदोलन केले. घोरपडी - भारत फोर्स या रस्त्यावरची दोन्ही बाजूची वाहतूक एक - दीड तास ठप्प झाली होती.यामुळे घोरपडी मध्ये मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी निर्माण झाली होती.

 

पोलिसांनी नागरिकांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. परंतु पाहिले पुनर्वसन करा अशी नागरिकांनी मागणी केली . त्यामुळे काही काळ पोलिस आणि नागरिक यांच्यामध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले. नागरिक आणि पोलिस यांच्यात शाब्दिक चकमक आणि किरकोळ धक्काबुक्कीही झाली. त्यामुळे पोलिसांनी मोठी फौज मागवली. 

नगरसेविका लता धायरकर यांनी नागरिकांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला परंतु नागरिक आपल्या मागणीवर अडून बसले होते. अखेर सर्व नागरिकांची जिजाऊ क्रीडा संकुलामध्ये दोन दिवस राहण्याची सोय केल्यानंतर नागरिकांनी आंदोलन मागे घेतले. तसेच दोन दिवसानंतर आयुक्तांची भेट घेऊन पुनर्वसनाचा निर्णय घेतला जाईल असे आश्वासन दिले.

घोरपडीतील उड्डाणपूल बांधण्यासाठी या अनाधिकृत घरावर कारवाई करण्यात आली. या नागरिकांना तीन वेळा नोटीस देण्यात आले आहे अशी माहिती रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आली. कारवाईच्या दरम्यान मोठ्या प्रमाणात रेल्वे पोलीस आणि रेल्वे कर्मचारी उपस्थित होते

अशी झाली कारवाई 
सकाळी अकरा वाजता रेल्वे प्रशासन मोठी फौज फाटा घेऊन शक्ती नगर परिसरात कारवाईसाठी आली. तेव्हा परिसरातील नागरिक मोठ्या प्रमाणावर कामानिमित्त बाहेर पडलेले होते.त्यामुळे घरातील सामान काढण्यासाठी नागरिकांची धावपळ झाली. एकीकडे बुलडोझर घराच्या दिशेने येत असताना घरातलं समान कसे वाचवावे असा प्रश्न नागरिकांना पडला होता. अनेकांना घरातील सामान काढण्यासाठी वेळच मिळाला नाही. कारवाई ची माहिती मिळताच कामावर गेलेले लोक धावत पळत आले. उघड्यावर पडलेल्या संसारातील सामान गोळा करू लागले. 

 

Web Title: Encroachment action in the area of Ghorpadi railway