पस्तीस वर्षांनंतर गांधीनगर रिकामे

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 29 जून 2018

औंध - पुणे-मुंबई मार्गावरील बोपोडीच्या गांधीनगर परिसरात गेली पस्तीस वर्षे असलेली वस्ती आज पूर्णपणे हटविण्यात आली. पुणे-मुंबई मार्गावर बोपोडीत उड्डाण पुलाचे काम सुरू आहे. त्यासाठी येथील झोपड्या हटविण्यात आल्या. पस्तीस वर्षे जपलेले ऋणानुबंध तुटल्याचे भाव येथील नागरिकांच्या चेहऱ्यावर दिसत होते; तसेच भावनिक संबंध जुळलेले शेजारी दुरावणार असल्याचे दुःखही दिसत होते. 

या स्थलांतरास काही नागरिकांचा विरोध, तर काहींचे समर्थन होते. परंतु, चोख सुरक्षाव्यवस्थेत आज येथील सर्व २६६ झोपड्या हटविण्यात आल्या.

गांधीनगरमधील नागरिकांनी बोपोडीत सदनिकांसाठी मागणी केली असताना तेथे सदनिका उपलब्ध नसल्याचे कारण सांगत त्यांना औंधमध्ये स्थलांतरित होण्याची जबरदस्ती केली. याविरोधात आम्ही न्यायालयात याचिका दाखल केली. त्यामुळे प्रशासनाला बोपोडीतील नागरिकांना १५६ सदनिका उपलब्ध करून देणे भाग पडले. 
- ॲड. मधुकर मुळे,  उपाध्यक्ष,  महाराष्ट्र लीगल सेल, भाजप

नागरिकांनी वस्ती खाली करण्यास सहकार्य केले. कुठल्याही प्रकारचे सुरक्षेचे प्रश्‍न निर्माण न झाल्याने स्थलांतर सोपे झाले.
- संदीप कदम, सहायक आयुक्त, औंध-बाणेर क्षेत्रीय कार्यालय

Web Title: encroachment completely removed in aundh