चिंचवडगावात बांधकामे पाडली

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 15 फेब्रुवारी 2019

पिंपरी - अतिक्रमणविरोधी विभागाने गुरुवारी (ता. १४) चिंचवडगाव, वाल्हेकरवाडी परिसरात केलेल्या कारवाईत ६० हून अधिक बांधकामे पाडली.

चिंचवडगावातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकाजवळील दहा दुकाने, टेनिस कोर्टाजवळील पार्किंगसाठीच्या आरक्षित असलेल्या जागेवरील ३० पत्राशेडवर कारवाई केली. वाल्हेकरवाडी येथेही घरे, गोदामांवर कारवाई केली. पालिकेचे कनिष्ठ अभियंता संभाजी गायकवाड म्हणाले, ‘‘चिंचवडगावातील बस स्थानक परिसरात दहा दुकानांवर कारवाई केली. येथे लवकरच रस्तारुंदीकरण करण्यात येणार आहे. दोन महिन्यांपासून नियोजन होते.’’

Web Title: Encroachment Crime