प्राधिकरणाच्या जागेवर अतिक्रमण

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 15 डिसेंबर 2018

पिंपरी - येथील इंद्रायणीनगरातील पेठ क्रमांक एकमध्ये पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाच्या जागेवर अतिक्रमण करून शेड बांधले. तेथे अनधिकृतपणे वाहने लावण्यात येत असून, वाहनचालक व इतर दारू पिऊन गोंधळ घालत असल्याने परिसरातील नागरिकांना त्रास होत आहे. या जागेवर अतिक्रमण होत असूनही प्राधिकरणाच्या दुर्लक्षामुळे नागरिकांमधून आश्‍चर्य व्यक्त होत आहे.

भोसरी परिसरात अनधिकृत बांधकामे दिवसेंदिवस वाढत आहेत. दोन महिन्यांपूर्वीच महापालिकेद्वारे भोसरीतील कै. अंकुशराव लांडगे नाट्यगृह परिसरातील सुमारे दीडशे अनधिकृत टपऱ्यांवर कारवाई केली होती. भोसरी एमआयडीसी परिसरातील जागेवर झोपडपट्टीच्या अतिक्रमणांबरोबरच रस्त्यावर टपऱ्या टाकून जागा बळकविण्याचे काम सध्या सुरू आहे. मात्र, आता प्राधिकरणाच्याच जागेवर अनधिकृत ताबा मिळवून शेड उभारण्यात आले. या जागेवरील अतिक्रमण हटविण्याची मागणी नागरिकांमधून होत आहे. पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाचे अध्यक्ष सदाशिव खाडे यांनी अतिक्रमणाविषयी माहिती घेऊन पुढील कारवाई करणार असल्याचे सांगितले. 

भोसरी, इंद्रायणीनगरातील पेठ क्रमांक एकमधील बी २/२० व त्यामागील जागेवर अतिक्रमण केले आहे. भंगार मालावर प्रक्रिया करण्यासाठीचा शेड  बांधले. याविषयी प्राधिकरणाकडे तक्रार केली; परंतु कारवाई झाली नाही. अतिक्रमण काढून सीमाभिंत बांधावी.
- संजय उदावंत, सामाजिक कार्यकर्ते

अतिक्रमणाची तक्रार प्राप्त झाल्यानंतर प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी जागेची पाहणी करून संबंधितांना नोटीस बजावली आहे. याविषयी तपासणी करून अतिक्रमणे हटविण्याची कारवाई करण्यात येईल.
- सतीशकुमार खडके, मुख्य कार्यकारी अधिकारी, प्राधिकरण  

Web Title: Encroachment on Pradhikaran Place